Tuesday, June 25, 2024

एका नजरेने करणार खल्लास! उर्वशी रौतेलाने तिच्या हॉट स्टाईलने लावली सोशल मीडियावर आग

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या ग्लॅमरस फोटो आणि अदाकारीसाठी ओळखली जाते. ती आपल्या स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. तिने आपल्या ग्लॅमरस लूक आणि अदाकारीच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळवली असून, ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करते. तिचे चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. तिने कुठलीही पोस्ट शेअर करताच ती सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असते. सध्या उर्वशी तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी नेदरलँडमध्ये आहे. तेथून तिने तिचा फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर राडा घालत आहे.

नेदरलँडमधील उर्वशीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक हॉट फोटो शेअर केला आहे. या क्लोजअप फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये उर्वशीने बदामी रंगाचा टॉप घातला आहे. तिने तिचे केस गुंडाळून घट्ट अंबाडा घातला आहे. पण चेहऱ्यावर दोन लट काढल्यामुळे तिचा हॉटनेस स्पष्टपणे दिसत आहे. यापूर्वी उर्वशीनेही तिचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये उर्वशीच्या व्हिडिओचे संपूर्ण बॅकग्राऊंड देखील व्हाइट थीममध्ये होते.

व्हिडिओमध्ये उर्वशी फोनवर बोलत खुर्चीवर बसते. यानंतर, फोन ठेवत, ती तिच्या पायांची तिढी घालते. यावेळी तिने एक पांढरा फ्रंट कट ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये ती एखाद्या परीपेक्षा कमी दिसत नव्हती. या डिझायनर ड्रेससह उर्वशीने तिचे केस मोकळे सोडले होते आणि कर्ल स्टाइल तिला शोभत होती. चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ खूप आवडला होता आणि आता ते लेटेस्ट फोटोंवर कमेंट करत आहेत. आगामी चित्रपटासाठी तिला शुभेच्छा देत आहेत. उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अलीकडेच उर्वशी रौतेला अरब सुपरस्टार मोहम्मद रमजानसोबत ‘वर्साचे बेबी’मध्ये दिसली होती. याशिवाय तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा