Monday, July 15, 2024

‘या’ नावाने ओळखला जाणार अनिल कपूरांचा नातू; व्हिडिओद्वारे झाला खुलासा

अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. अभिनेते अनिल कपूर हे आजोबा बनले आहेत. सोनमने 20 ऑगस्ट रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर हे जोडपे आता आई-वडील बनल्याचा आनंद लुटत आहेत. सोनम आणि आनंद यांनी आतापर्यंत त्यांच्या मुलाच्या नावाचा खुलासा केला नव्हता. मात्र, सोनमची बहीण रिया कपूर हिने बाळाच्या टोपणनावाचा खुलासा केला होता. तिने सांगितले की, ती मुलाला सिंबा या नावाने पुकारते. आता बाळाच्या नावाचा खुलासा झाला आहे.

खरं तर, अनिल कपूर (Anil Kapoor) यांची मुलगी सोनम कपूर (Sonam Kapoor) हिने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत बाळाच्या नावाबद्दल हिंट दिली होती. सोनम कपूरने बाळासाठी कस्टमाईज्ड ब्लँकेट आणि कपडे बनवले होते, ज्यावर बाळाचे नाव लिहिले होते. तिच्या बाळाचे नाव के आहुजा आहे. आता अनेकजण विचारात पडले आहेत की, तिने बाळाचे जे नाव ठेवले आहे, त्याचे पहिले अक्षर हे ‘के’पासून सुरू होते. सोनमला सादर करणाऱ्या किड्स ब्रँडने त्याच्या एका व्हिडिओ पोस्टमध्ये त्याची झलकही दाखवली.

किड्स ब्रँडने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “आम्ही सोनम कपूर हिला तिच्या आयुष्यातील या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देतो. आम्ही याचा एक छोटा भाग बनून खूप खुश आहोत.” व्हिडिओत दिसते की, यामध्ये काही बाळांचे आऊटफिट आणि वस्तू आहेत. काही आऊटफिटवर ‘आहुजा’ असे लिहिले आहे. तसेच, एका आऊटफिटवर ‘बेबी के आहुजा’ असे लिहिले आहे.

आधीपेक्षा वेगळी असेल सोनमची कारकीर्द
सोनम कपूर डिलीव्हरीपूर्वी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सिनेमात पुनरागमन करण्याबद्दल बोलली होती. तिने म्हटले होते की, “सर्वकाही डिलीव्हरीनंतर वेगळे असेल.” आता सोनम आणि आनंद आहुजा (Anand Ahuja) यांची प्राथमिकता ही त्यांचे बाळ आहे. सोनमने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तिची कारकीर्द आधीपेएक्षा खूपच वेगळी असेल. ती नेहमी सिनेमांच्या मागे धावली नाहीये.

काय म्हणाली सोनम?
ती म्हणाली की, “मी फक्त माझे काम करत आहे. मला वाटत नाही की, ते बदलेल, परंतु प्राधान्यक्रम बदलतात आणि मला वाटते की, माझे प्राधान्य माझ्या बाळाला असेल. सत्य हे आहे की, बाळाने या जगात येणे निवडले नाही. आम्ही त्याला इथे आणायचे ठरवले, त्यामुळे हा अतिशय स्वार्थी निर्णय आहे.” तिने असेही म्हटले की, ती एक आई म्हणून तिचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल.

सोनमच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द झोया फॅक्टर’ या सिनेमात दिसली होती. ती आगामी काळात ‘ब्लाईंड’ या सिनेमात झळकणार असल्याच्या बातम्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सव्वाशे कोटीत बनलेल्या ‘लायगर’ने धड 50 कोटीही नाही छापले, थिएटरमधील प्रेक्षकसंख्या पाहून भावूक झाला विजय
शॉकिंग! प्रसिद्ध गायिकेची गळा दाबून हत्या, पोस्टमार्टममध्ये मोठा खुलासा
पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये वयाच्या चाळिशीतही मलायका अरोराचा जलवा, फोटो पाहून हरपेल भान

हे देखील वाचा