Thursday, July 18, 2024

धक्कादायक! आईसाठी औषधे घेऊन जात असताना अभिनेत्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात घेतोय उपचार

कलाविश्वातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. ‘खिचडी’ फेम अभिनेता पुनीत तलरेजा याच्यावर हल्ला झाला आहे. रविवारी (दि. 28 ऑगस्ट) रात्री स्कूटरवरून आपल्या आईसाठी औषधे खरेदी करून परतताना त्याच्यावर अंबरनाथ वस्तीत हा हल्ला झाला. ठाणे जिल्ह्यातील दोन व्यक्तींनी कथितरीत्या त्याच्यावर हल्ला केला. पुनीतला लोखंडी रॉड आणि इतर हत्यारांनी मारहाण करण्यात आली. अभिनेत्याला मारहाण केल्यानंतर त्याला तिथेच सोडून अनोळखी व्यक्तींनी तिथूनच पळ काढला.

अभिनेत्यावर लोखंडी रॉडने हल्ला
अंबरनाथ येथील शिवाजीनगर ठाण्यातील एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, जेव्हा अभिनेता पुनीत तलरेजा (Punit Talreja) स्कूटीवरून जात होता, तेव्हा दुसऱ्या एका स्कूटरवर आलेल्या दोन व्यक्तींनी त्याची वाट रोखली. त्यानंतर त्यांनी त्याला शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि इतर हत्यारांनी मारहाण (Punit Talreja Attack) केली.

पोलीस हल्लेखोरांच्या शोधात
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, पुनीत तलरेजाला यादरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. तेथून जाणाऱ्या काही लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कुणालाही अटक झाली नाहीये. तसेच, अद्याप हल्लेखोरांबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाहीये. माहिती मिळताच, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलीस या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ‘Punit Talreja’ (@ipunittalreja)

पुनीत तलरेजाची कारकीर्द
अभिनेता पुनीत तलरेजा याच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर ३४ वर्षीय पुनीतने आतापर्यंत अनेक कॉमेडी पात्र साकारले आहेत. मात्र, त्याला खरी ओळख ही ‘खिचडी’ आणि ‘बडी दूर से आये है’ या मालिकेतून ओळख मिळाली. खरं तर, अभिनयात येण्यापूर्वी तो सीएची तयारी करत होता, पण त्याला अभिनयात कारकीर्द घडवायची होती. त्यामुळे त्याने आपला मार्ग वळवला आणि तो अभिनयात आला. आज त्याने टीव्ही इंडस्ट्रीत वेगळी ओळख बनवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ नावाने ओळखला जाणार अनिल कपूरांचा नातू; व्हिडिओद्वारे झाला खुलासा
सव्वाशे कोटीत बनलेल्या ‘लायगर’ने धड 50 कोटीही नाही छापले, थिएटरमधील प्रेक्षकसंख्या पाहून भावूक झाला विजय
शॉकिंग! प्रसिद्ध गायिकेची गळा दाबून हत्या, पोस्टमार्टममध्ये मोठा खुलासा

हे देखील वाचा