Sunday, March 16, 2025
Home हॉलीवूड विल स्मिथची झापड अजूनही विसरला नाही ख्रिस रॉक! घेतला मोठा निर्णय, घडणार का अनर्थ?

विल स्मिथची झापड अजूनही विसरला नाही ख्रिस रॉक! घेतला मोठा निर्णय, घडणार का अनर्थ?

ऑस्कर 2022 हे सर्वांच्या लक्षात राहणारं आहे. कारण, मार्च महिन्यात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात असे काही घडले होते, जे कदाचित लोक कधीही विसरू शकणार नाहीत. ती घटना म्हणजे ख्रिस रॉक आणि विल स्मिथ यांच्यातील ‘थप्पड कांड’ होय. आख्ख्या जगासमोर हॉलिवूड सुपरस्टार विल स्मिथ याने सूत्रसंचालन करत असलेल्या ख्रिसच्या कानाखाली वाजवली होती. या घटनेला अनेक महिने उलटले असले, तरीही त्या चापटीचा आवाज आजही ख्रिसच्या कानात घोंगत असल्याचे वाटत आहे. कारण, ख्रिसने ऑस्कर 2023 पुरस्कारांचे होस्टिंग करण्यास नकार दिला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ‘थप्पड कांड’ चर्चेत आले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षांच्या पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची ऑफर घेऊन ऑस्कर ख्रिस रॉक (Chris Rock Oscars 2023) याच्याकडे पोहोचला होता. मात्र, त्याने ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्यास नकार दिला. असे म्हटले जात आहे की, याबद्दल ख्रिसचे म्हणणे आहे की, ऑस्करचे पुन्हा सूत्रसंचालन करणे म्हणजे अपघाताच्या ठिकाणी परत येण्यासारखे होईल. तो सुपर बॉलच्या कमर्शियलमध्येही सहभागी होणार नाही, असा दावाही करण्यात आला आहे.

विलने का मारली होती ख्रिसला चापट?
ख्रिस रॉक ऑस्करच्या स्टेजवर सूत्रसंचालन करत होता. तो विनोद करत सूत्रसंचालन करत होता. तेव्हाच विल स्मिथ याची पत्नी जाडा पिंकेट स्मिथ हिच्या टक्कल केलेल्या डोक्यावरून (आजारपण) रॉकने थट्टा उडवली. ही गोष्ट विलला जरादेखील आवडली नाही. तो त्याच्या खुर्चीवरून उठला, स्टेजवर गेला आणि सर्वांसमोर ख्रिसला चापट मारली. काही सेकंद कुणालाच काही कळले नाही. या घटनेनंतर विलला जोरदार ट्रोल करण्यात आले होते.

ऑस्करने विल स्मिथला 10 वर्षांसाठी केले बॅन
या ‘थप्पड कांड’नंतर चांगलेच वातावरण तापले होते. विल स्मिथला ऑस्कर अकादमीतून राजीनामा द्यावा लागला होता. त्याने सार्वजनिकरीत्या घडल्या प्रकरणाची माफीही मागितली होती, पण जेव्हा प्रकरण चांगलेच तापल्यानंतर ऑस्करने विलवर 10 वर्षांसाठी बंदी घातली.

आता ऑस्कर 2023 पुरस्कारांचे सूत्रसंचालन कोण करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! आईसाठी औषधे घेऊन जात असताना अभिनेत्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात घेतोय उपचार
‘या’ नावाने ओळखला जाणार अनिल कपूरांचा नातू; व्हिडिओद्वारे झाला खुलासा
सव्वाशे कोटीत बनलेल्या ‘लायगर’ने धड 50 कोटीही नाही छापले, थिएटरमधील प्रेक्षकसंख्या पाहून भावूक झाला विजय

हे देखील वाचा