Monday, July 15, 2024

सुनील शेट्टीच्या घरात एकाच दिवशी दोन लग्न? पाहा कोण चढणार लग्नाच्या बोहल्यावर!

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कॅटरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नानंतर, चाहत्यांच्या नजरा आता इतर अनेक सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्याकडे लागल्या आहेत. आता सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) घराच्याही लग्नसंबंधित बातम्या समोर येत आहेत. सुनीलची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि मुलगा अहान शेट्टी (Ahan Shetty) याच वर्षी लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. अहान गर्लफ्रेंड तान्या श्रॉफला (Tanya Shroff) आपली वधू बनवेल, तर अथिया केएल राहुललाही (KL Rahul) तिचा साथीदार बनवेल.

माध्यमातील वृत्तानुसार, सुनील शेट्टीच्या घरी लवकरच डबल सेलिब्रेशन होणार आहे. अथिया आणि अहान या वर्षी लग्न करू शकतात, अशा बातम्या समोर येत आहेत. मात्र, याबाबत शेट्टी कुटुंबाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. (suniel shetty son ahaan girlfriend tania shroff and daughter athiya boyfriend kl rahul will get married together)

अथिया आणि राहुल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करतात. म्हणजेच सार्वजनिकरित्या त्यांनी त्यांचे नाते अधिकृत केले आहे.

त्याचवेळी ‘तडप’ अभिनेता अहानही तान्या श्रॉफला बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे. दोघांना अनेकदा अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट केले जाते.

अथिया शेट्टीचे चित्रपट
अथिया शेट्टीला लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याची आवड होती. मात्र, तिचा एकही चित्रपट आतापर्यंत हिट झालेला नाही. अथियाने ‘हीरो’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर अभिनेत्रीने ‘नवाबजादे’, ‘मुबारकां’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ सारख्या चित्रपटांमध्येही काम केले. पण या चित्रपटांनीही थिएटरमध्ये विशेष काही केले नाही.

तर दुसरीकडे, अहानने अलीकडेच ‘तडप’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे.

हेही वाचा :

‘रणबीर कपूर म्हणत असेल, धन्यवाद देवा ब्रेकअप केला’, ‘गेहेराईयाचा’ ट्रेलर पाहून केआरकेने उडवली दीपिकाची खिल्ली

महाराष्ट्राची कन्या बनली हैदराबादची सून, नम्रता शिरोडकर आणि महेश बाबूची अनोखी लव्हस्टोरी | HBD Namrata Shirodkar

नोरा फतेही आणि टेरेन्स लुईसची सिझलिंग केमेस्ट्री, व्हिडिओने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

हे देखील वाचा