सुनील पालने ‘द फॅमिली मॅन’साठी मनोज बाजपेयींवर साधला निशाणा; म्हणाला, ‘इतका निर्लज्ज व वाया गेलेला माणूस…’


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याच्या अटकेमुळे इंडस्ट्रीतील सर्वांनाच धक्का बसला आहे. अश्लिल चित्रपट बनवून ऍप्सवर प्रसिद्ध केल्याप्रकरणी, मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राला अटक केली आहे. बॉलिवूडमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर, प्रत्येकजण आपापल्या प्रतिक्रिया देताना दिसून आले आहे. अशा परिस्थितीत प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पालनेही बॉलिवूड सेलिब्रिटींवर हल्लाबोल केला आहे. खासकरुन अशा सेलिब्रिटींवर जे वेबसिरीजचा भाग आहेत. या यादीत मनोज बाजपेयी यांचे देखील नाव अव्वल स्थानी येते.

सुनील पाल याने ‘द फॅमिली मॅन’च्या नव्या सीझनसाठी मनोज बाजपेयी यांना फटकारले आहे. त्याच्या मते, या वेबसिरीजचा सामान्य कुटुंबांवर वाईट परिणाम होत आहे. अगदी लहान मुलांचे प्रेमप्रकरणही यात दाखविले आहे. या सिरीजमध्ये मनोज यांची ऑनस्क्रीन पत्नी प्रियामणीचे विवाहबाह्य संबंधही आहेत. सुनीलच्या म्हणण्यानुसार, असे शो अश्लीलतेला चालना देतात.

याबद्दल बोलताना सुनील पाल म्हणाला, की “जे काय झाले ते होणे गरजेचे होते आणि ते होणारच होते. मी असे म्हणत आहे, कारण मोठे लोक डिजिटल प्लॅटफॉर्मवर सेन्सॉरशिप नसल्याचा फायदा घेत आहेत. ते अश्लील दृश्ये आणि आक्षेपार्ह भाषा वापरत आहेत. अभिनेता मनोज बाजपेयी कितीही महान अभिनेते असले तरीही, त्यांच्यापेक्षा निर्लज्ज व वाया गेलेला माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. (sunil pal blast on manoj bajpayee for the family man series Says never seen a more badtameez and gira hua insaan)

सुनील पाल मनोज बाजपेयी यांची खिल्ली उडवत म्हणाला, “तुम्ही ‘द फॅमिली मॅन’ या शोचा एक भाग आहात. ज्यामध्ये पत्नी आणि त्यांच्या मुलीचे अफेअर दाखवले गेले आहे. या सिरीजमध्ये त्यांचा मुलगाही मोठ्या लोकांसारखा वागताना दिसून आला आहे. कुटुंब अशाप्रकारचे असते का? त्यांनी आता लोकांना प्रश्नात पाडलंय कि नेमकं लोनावळात काय घडलं होतं, तुमच्याकडे आता दाखवण्यासारखे काय बाकी आहे?”

असे म्हणत सुनील पालने मनोज बाजपेयींवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वाढदिवशी क्रिती सेननने चाहत्यांना केले खुश; एवढ्या धावपळीतही दिली त्यांना सेल्फी

-कारगिल विजय दिन: सैनिकांच्या नावावर अजय देवगणची खास कविता; अक्षयनेही दिली अशी प्रतिक्रिया

-या अभिनेत्यांनी खोटे सिक्स पॅक वापरून केलंय चित्रपटात काम; मात्र प्रेक्षकांना हे समजताच करावा लागला ट्रोलिंगचा सामना


Leave A Reply

Your email address will not be published.