Saturday, June 29, 2024

सनी पाजीच्या ‘Gadar 2’ने उडवला बार! 15 ऑगस्टच्या दिवशी छापले ‘एवढे’ कोटी, कमाई 200 कोटींच्या पार

बॉक्स ऑफिसवर सध्या अनेक सिनेमे चमकदार कामगिरी करत आहेत. मात्र, या सर्वांमध्ये आघाडीवर असणारा सिनेमा म्हणजे सनी देओल याचा ‘गदर 2‘ होय. 11 ऑगस्ट रोजी रिलीज झालेला हा सिनेमा दरदिवशी नवनवे विक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे. पहिल्या चार दिवसातच सिनेमाने दीडशे कोटी कमाईचा आकडा पार केला होता. अशात 15 ऑगस्ट रोजी 77व्या स्वातंत्र्यदिनी ‘गदर 2’ने बॉकिसवर तुफान कमाई केली आहे. चला तर, जाणून घेऊयात ‘गदर 2’ने पाचव्या दिवशी किती कमाई केली.

बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’चा जलवा
बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’ (Gadar 2) सिनेमाचा जलवा आधीपासूनच कायम आहे. या सिनेमाने अवघ्या 4 दिवसात 173.58 कोटी रुपयांची कमाई केली होती. गदरने पहिल्या दिवशी 40.10 कोटी, दुसऱ्या दिवशी 43.08 कोटी, तिसऱ्या दिवशी 51.70 कोटी आणि चौथ्या दिवशी 38.70 कोटी रुपयांची कमाई केली होती. अशात पाचव्या दिवसाची कमाई समोर आली आहे. ही कमाई आतापर्यंतच्या चारही दिवसांपेक्षा जास्त आहे. यामुळे सिनेमाने खास क्लबमध्येही एन्ट्री केली आहे.

स्वातंत्र्यदिनी किती छापले?
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘गदर 2’ सिनेमाने 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी तब्बल 55.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर सिनेमाची कमाई 228 कोटी रुपये झाली आहे. ‘गदर 2’ सिनेमा अवघ्या पाचच दिवसात 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. यामुळे अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि त्याच्या चाहत्यांचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे.

सिनेमा 300च्या क्लबमध्येही सामील होण्याची शक्यता
सिनेमातील कलाकारांविषयी बोलायचं झालं, तर सनी देओल याच्याव्यतिरिक्त सिनेमात अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि मनीष वाधवा या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अशात सिनेमाच्या कमाईचा वेग पाहता असे म्हटले जात आहे की, हा सिनेमा लवकरच 300 कोटींच्या क्लबमध्येही एन्ट्री करेल. (sunny deol film gadar 2 box office collection day 5 know here)

महत्त्वाच्या बातम्या-
‘राधाकृष्ण’फेम अभिनेत्याने लग्नाच्या 9 वर्षानंतर पत्नीला दिला घटस्फोट; म्हणाला, ‘डिप्रेशनमध्ये…’
बॉलिवूडमध्ये यशाचे समीकरण बदलावणारी दिग्दर्शक अभिनेता जोडी, म्हणजे डेव्हिड धवन आणि गोविंदा

हे देखील वाचा