Thursday, September 28, 2023

‘राधाकृष्ण’फेम अभिनेत्याने लग्नाच्या 9 वर्षानंतर पत्नीला दिला घटस्फोट; म्हणाला, ‘डिप्रेशनमध्ये…’

गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वातील एकवर एक जोडप घटस्फोट घेत आहे. अनेक सेलिब्रिटींची नाती तुटली आहेत. सध्या घटस्फोटाच्या बातम्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अशातच आता ‘रब से सोहना इश्क’ आणि ‘राधाकृष्ण’ यांसारख्या टीव्ही शोमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता कानन मल्होत्रा पत्नीपासून विभक्त झाला असल्याचे समोर आले आहे.

2014 मध्ये काननने (Kanan Malhotra) दिल्लीतील इंटिरियर डिझायनर आकांक्षा धिंग्रासोबत अरेंज मॅरेज केले होते. कानन आणि आकांक्षा पाच वर्षांपासून वेगळे राहत होते. या वर्षी मे महिन्यात त्यांचा घटस्फोट झाला. त्याचवेळी एका मुलाखतीत काननने त्याच्या घटस्फोटाबद्दल सांगितले आहे.

इ-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कानन म्हणाला की, “आमच्यामध्ये गोष्टी ठीक चालत नव्हत्या. काही समस्या होत्या. भांडण झाले नाही श. पण आम्ही एकाच पानावर नव्हतो. काम करत नसलेल्या नात्याचा पाठपुरावा करण्याऐवजी आम्ही वेगळे होऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला. तीन-चार महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला.”

घटस्फोटाचे कारण सांगताना अभिनेता कानन म्हणाला, “मी या गोष्टीमुळे खूप अस्वस्थ होतो. लग्न ही खाजगी गोष्ट आहे आणि विभक्त होण्यासाठी कोणीही हे करत नाही. मी खूप अस्वस्थ होतो आणि काही महिने डिप्रेशनमध्ये होतो.”

घटस्फोटासाठी इतका वेळ का लागला यावर कानन म्हणाला की, “काही गोष्टी होत्या, कोर्टात केस होती, त्यामुळे ही एक प्रक्रिया होती. यामध्ये कुटुंबीयांचा सहभाग होता. त्यांनी आमच्या निर्णयाचा आदर केला. आम्ही ते परस्पर आणि सकारात्मक नोटवर संपवले. म्हणूनच वेळ लागला.” (‘Radhakrishna’ fame actor Kanan Malhotra divorced his wife after 9 years of marriage)

अधिक वाचा- 
बॉलिवूडमध्ये यशाचे समीकरण बदलावणारी दिग्दर्शक अभिनेता जोडी, म्हणजे डेव्हिड धवन आणि गोविंदा
बारा वर्षांनी मोठ्या मुलीशी लग्न करणारा सैफ आहे 800कोटींहून अधिक संपत्तीचा मालक, ताफ्यात आलिशान गाड्या

हे देखील वाचा