Wednesday, July 3, 2024

‘गदर 2’ची गाडी एकदम सुसाट! भारतातच नाही, तर ‘गदर 2’चा डंका जगभरात; अखेर केला 400कोटींचा आकडा पार

‘गदर 2’ने बाॅक्स ऑफिसवर धूमाकूळ घातला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपट गृहात मोठी गर्दी केली आहे. हा चित्रपट अनेक हिंदी चित्रपटांना टक्कर देत आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकाच वर्षात दोन चित्रपटांनी 400 कोटींचा टप्पा ओलांडण्याची हिंदी चित्रपटसृष्टीत ही पहिलीच वेळ आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘पठाण’ चित्रपटानंतर आता अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेलचा चित्रपट ‘गदर 2‘ देखील या खास क्लबमध्ये दाखल झाला आहे.

गदर 2‘ (Gadar 2) चित्रपटाने रिलीजच्या 12व्या दिवशी हा अद्भुत पराक्रम दाखवला आहे. ‘पठाण’ चित्रपटाने रिलीजच्या 11व्या दिवशी 400 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे.’गदर 2′ चित्रपटातील सर्व स्टार्ससाठी मंगळवारी एक आनंदाची बातमी आहे. 12 व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या मंगळवारी ‘गदर 2’ चित्रपटाने सुरुवातीच्या ट्रेंडनुसार सुमारे 11.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘गदर 2’ देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर त्याची जोरदार दौड सुरू ठेवली आहे. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन 400.10 कोटी रुपये झाले आहे. हा आकडा पार करणारा ‘गदर 2’ हा भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील दुसरा हिंदी चित्रपट आहे. ‘पठाण’ आणि ‘गदर 2’ व्यतिरिक्त, जे हिंदीमध्ये बनवले गेले आणि प्रदर्शित झाले, या क्लबमध्ये इतर भाषांमध्ये बनवलेले आणि हिंदीमध्ये रिलीज झालेल्या ‘बाहुबली 2’ आणि ‘KGF 2’ आणखी दोन चित्रपटांचा समावेश आहे.

या यादीत आतापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीतील संजय दत्त आणि शाहरुख खान या दोनच नायकांचा समावेश होता. हिरोइन्समध्ये फक्त दीपिका पदुकोणचेच नाव घेतले जाते. आता सनी देओल, उत्कर्ष शर्मा, अमिषा पटेल आणि सिमरत कौर यांनीही या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. तर 400 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणार्‍या दिग्दर्शकांमध्ये अनिल शर्माची एंट्री सर्वात जुनी आहे. (Sunny Deol Ghadar 2 earned 400 crores)

अधिक वाचा-
अभिनंदन! प्रवीण तरडे यांना ‘फकिरा पुरस्कार’ जाहीर, होतोय कौतुकाचा वर्षाव
वयाने 13 वर्ष लहान जैदसह लग्नापासून ते अज्ञाताने कानशिलात लगावण्यापर्यंत, ‘या’ वादांमध्ये अडकलेली गौहर खान

हे देखील वाचा