Saturday, September 30, 2023

‘फ्रेंडशिप डे’निमित्त दीपिकाची रणवीरसाठी भावूक पोस्ट; म्हणाली, ‘लग्न कर…’

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही अनेकदा चाहत्यांना कपल गोल देताना दिसतात. रणवीर आणि दीपिका सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट देखील शेअर करतात. पुन्हा एकदा दीपिकाने असेच काहीसे करताना दिसली. दीपिकाने अलीकडेच ‘फ्रेंडशिप डे‘च्या निमित्ताने पती रणवीरसाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

दीपिका (Deepika Padukone)  सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे आणि रणवीरचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिने नुकतीच केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑगस्ट महिण्याच्या पहिल्या आठवड्यात फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या वर्षी 6 ऑगस्ट रोजी देशभरात फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला. सर्वसामान्यांपासून ते सिनेतारकांपर्यंत सोशल मीडियावर आपल्या मित्रांसोबत फोटो पोस्ट करून शुभेच्छा दिल्या. रात्री उशिरा भिनेत्री दीपिका पदुकोणनेही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मैत्रीबद्दल एक विशेष पोस्ट शेअर केली.

Deepika Padukone

दीपिकाने ती पोस्ट रणवीरला टॅग केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, “तुझ्या जिवलग मित्राशी लग्न कर”, मी असं म्हणत नाहीये. जेव्हा तुमची मैत्री घट्ट होते, तेव्हा तुम्ही प्रेमात पडाल. तुम्ही अशा माणसाशी लग्न करा जो तुमच्यातील वेडेपणा बाहेर काढू शकेल आणि तुमचे सुख आणि दुःख समजू शकेल.” तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पोस्ट समोर आल्यानंतर, चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. रणवीरने या पोस्टवर हार्ट इमोजी लिहून आपले प्रेम व्यक्त केले आहे.

दरम्यान, दीपिका आणि रणवीर सिंग यांची प्रेमकहाणी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. सहा वर्षे डेटिंग केल्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांनी इटलीमध्ये लग्न केले. या जोडप्याची प्रेमकहाणी राम-लीलापासून सुरू झाली. रामलीलानंतर दीपिका आणि रणवीरने फाइंडिंग फॅनी, बाजीराव-मस्तानी, पद्मावत मध्ये एकत्र काम केले. (actress deepika padukone showered love on her best friend on friendship day Actor ranveer singh got emotional after seeing the note)

अधिक वाचा- 
BREAKING! प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचा धक्कादायक मृत्यु; ‘हे’ आहे तिच्या मृत्यूचे कारण
सोज्वळ चेहरा आणि निखळ अभिनय; वैदेही परशुरामी ग्लॅमरस अदा

हे देखील वाचा