सलमान खानला वाटतेय ‘आरआरआर’ची भीती? निर्मात्यांना दिली ‘ही’ चेतावणी


ब्लॉकबस्टर ‘बाहुबली‘ चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली आता आणखी एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. त्यांचा ‘आरआरआर‘ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांचाही भरणा आहे. त्यात आलिया भट्ट आणि अजय देवगण तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा प्रदर्शनपूर्व कार्यक्रम पार पडला, त्यात सुपरस्टार सलमान खाननेही हजेरी लावली होती. मात्र, यादरम्यान त्याने चित्रपटाच्या निर्मात्यांना एक चेतावणी दिली.

या कार्यक्रमामध्ये सलमान खानने (Salman Khan) आपल्या ‘बजरंगी भाईजान २’ (Bajrangi Bhaijaan 2) या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. सोबतच त्याने निर्मात्यांना चेतावणीही दिली आहे. सलमानने निर्मात्यांना आपला चित्रपट पुढे ढकलण्यास सांगितले आहे.

निर्मात्यांना चेतावणी
सलमानने या कार्यक्रमात चित्रपट निर्मात्यांना चेतावणी दिली आहे की, ‘आरआरआर’ (RRR) प्रदर्शित झाल्यानंतर चार महिने त्यांनी आपला चित्रपट प्रदर्शित करू नये. जेणेकरून तो ‘आरआरआर’शी स्पर्धा टाळू शकेल.

राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरची प्रशंसा
या कार्यक्रमात सलमानने सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआरचे (JR NTR) कौतुक केले. त्याने ज्युनिअर एनटीआरच्या चित्रपटांबद्दल प्रेम व्यक्त केले. तसेच त्याला नैसर्गिक कलाकार देखील म्हटले. सलमान पुढे म्हणाला की, “मी नेहमीच राम चरणला दुखापतीसोबतच पाहिले आहे. जेव्हा जेव्हा मी त्याला दुखापत कशी झाली, असे विचारतो, तेव्हा मला वाटते की त्याचे वर्कआउट सत्र, शूटिंग सिक्वेन्स हे त्याच्या दुखापतीमागील कारण आहे. तो खूप मेहनती आहे आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये खूप मेहनत घेतो.”

‘बजरंगी भाईजान २’ चित्रपटाची घोषणा
सलमानने या कार्यक्रमादरम्यान आपल्या ‘बजरंगी भाईजान २’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट एसएस राजामौलींचे वडील विंजेंद्र प्रसाद लिहिणार आहेत. ‘बजरंगी भाईजान’ (Bajrangi Bhaijaan) बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. हा सिनेमा २०० कोटी रुपयांच्या क्लबमध्येही सामील झाला होता.

माध्यमांनी जेव्हा चित्रपटाचे लेख विजेंद्र प्रसाद (Vijayendra Prasad) यांच्याशी चित्रपटाबद्दल चर्चा केली, तेव्हा त्यांनी सांगितले की, “मला ‘बजरंगी भाईजान’बद्दल बोलण्याचे स्वातंत्र्य नाहीये. याबद्दल सर्व गोष्टी सलमान भाईच करेल.”

सलमानच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं, तर तो शेवटचा ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ या चित्रपटात झळकला होता. यामध्ये त्याच्यासोबत आयुष शर्माही मुख्य भूमिकेत होता. आता तो कॅटरिना कैफसोबत ‘टायगर ३’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे बरेच शूटिंग झाले आहे. आता लवकरच चित्रपटाचे शेवटचे स्केड्युल दिल्ली येथे शूट होणार आहे. चाहते त्याच्या या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!