‘या’ स्पर्धकाने स्टेजवर काढली वडिलांची आठवण, भावूक होताच आईने दिला आधार; माधुरीच्याही डोळ्यात अश्रू

0
109
Paras-Kalnawat
Photo Courtesy : Instagram/colorstv

छोट्या पडद्यावरील काही शो प्रेक्षकांना इतके आवडतात की त्यांचे पुढील सिझन (पर्व) झटपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. असाच एक डान्स रियॅलिटी शो म्हणजे ‘झलक दिखला जा‘ होय. या शोचे सध्या 10वे पर्व सुरू आहे. शोमध्ये यावेळी टीव्हीवरील मोठमोठे कलाकार आले आहेत. त्यामध्ये ‘अनुपमा’ फेम अभिनेता पारस कलनावत हादेखील स्पर्धक आहे. या शोमधून पारसला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. पारसने ‘अनुपमा’ शो सोडल्यानंतर ‘झलक दिखला जा’ शोने त्याच्याशी करार केला होता. त्यामुळे चॅनेलने त्याच्यासोबतचा करार संपवला होता. यामुळे तो चांगलाच वादातही अडकला होता. याव्यतिरिक्तही त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत.

कलर्सच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेता पारस कलनावत (Paras Kalnawat) कौटुंबिक अभिनय सादर करताना दिसतोय. यामध्ये पारस त्याच्या वडिलांच्या आठवणीत रमल्याचे दिसत आहे. परफॉर्मन्सनंतर पारस सांगतो की, त्याच्या वडिलांनी कुटुंबासाठी खूप संघर्ष केला होता आणि आज तो जो काही आहे, ते फक्त त्यांच्यामुळेच आहे. पारसला भावूक झाल्याचे पाहून त्याची आईदेखील स्टेजवर येते. त्यानंतर पारस आपल्या आईला मिठी मारून रडू लागतो. स्टेजवरील हा क्षण पाहून परीक्षक माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हीदेखील भावूक होते. त्याचबरोबर शोमधील स्पर्धक निया शर्मा (Nia Sharma) हिच्या डोळ्यातही अश्रू तरळतात.

पारस कलनावत याने या शोमध्ये येताच प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे. त्याने त्याच्या डान्स मूव्ह्जने परीक्षकांचीही मने जिंकली आहेत. डान्स कौशल्यांव्यतिरिक्त पारस हँडसम हंक पर्सनॅलिटी आणि गुड लूक्समुळेही चर्चेचा धनी ठरतो. मागील काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या क्रशचाही खुलासा केला होता. त्याने परीक्षक नोरा फतेहीला क्रश म्हटले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

याव्यतिरिक्त पारसचे प्रेमप्रकरणही वादाच्या भोवऱ्यात राहिले आहे. पारस ‘अनुपमा’ शोमध्ये येण्यापूर्वी अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिला डेट करत होता. मात्र, दोघांचे नाते खूप दिवस टिकले नाही, त्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले. पारस त्याच्या नात्याविषयी खूप गंभीर होता. मात्र, उर्फीने त्याची साथ सोडली होती. ब्रेकअपनंतर पारस खूप तुटला होता. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. मात्र, आता पारस यशाच्या पायऱ्या चढताना दिसत आहे. चाहतेही त्याला भरभरून प्रेम देत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पनवेलच्या फार्महाऊसची रेकी करून बिश्नोई गँगने केलेला बंदोबस्त; सलमानच्या हत्येसाठी काय होता ‘प्लॅन बी’
‘तारक मेहता’ मालिका सोडून ‘या’ कलाकारांनी केली घोडचूक, लोकप्रियतेपासून राहिले दूर
रिचा चड्ढाच्या चाहत्यांनी अली फजल सोडून भलत्याच अलीसोबत बनवली जोडी, अभिनेत्रीने ट्वीटद्वारे दिले उत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here