Friday, April 19, 2024

‘सूर्या 42’ चित्रपटातील सीन लिक झाल्याने निर्मात्यांचा संताप; म्हणाले, ‘डिलीट करा नाहितर…’

साऊथची सुपरस्टार सुर्या आणि दिशा पटानी लवकरच ‘सूर्या 42‘ चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरू आहे. दरम्यान, नुकतेच या दोघांचे शूटिंग सेटवरील काही  फोटो व्हायरल झाले होते. आता या चित्रपटाच्या निर्मात्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सोशल मीडियावर लीक झालेल्या फोटो आणि व्हिडिओंवर तीव्र आक्षेप घेत चित्रपटाच्या निर्मात्यांनी लोकांना ते हटवण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच ते यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबतही बोलले आहे.

‘सूर्या 42’चे फाेटाे आणि व्हिडिओ लीक झाल्याने दु:खावले चित्रपट निर्माते
स्टुडिओ ग्रीनने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून चित्रपटाचे फोटो आणि व्हिडिओ लीक झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत एक नोट शेअर केली आहे. स्टुडिओने ट्विट केले की, ” सर्वांना नम्र विनंती आहे की,  कृपया ‘सूर्या 42’ च्या शूटिंगशी संबंधित कोणतेही व्हिडिओ किंवा फोटो शेअर करू नका.” ते बनवण्यासाठी संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. आम्हाला हे लोकांना भेट म्हणून द्यायचे आहे. तुम्ही चित्रपटा संबधी पोस्ट डिलीट केल्यास आमच्यावर कृपा होईल. आणखी आम्ही विनंती करताे की, भविष्यात असे करू नका, अन्यथा आम्ही याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करू.

रुपेरी पडद्यावर सुर्या आणि दिशा पहिल्यांदा दिसणार एकत्र
सुर्याचा हा चित्रपट एक एडवेंचर ड्रामा आहे. सिरुथाई सिवा यांनी हा चित्रपट लिहिला आहे. त्याचे दिग्दर्शनही ते करत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, निर्माते हा चित्रपट 10 भाषांमध्ये प्रदर्शित करण्याची तयारीत आहेत. सुर्या आणि दिशा पटानी यांची जोडी या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.

सुर्या हा दाक्षिणात्य सिने जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे. सुर्याचा फक्त दाक्षिणात्य सिने जगताच नव्हेतर बॉलिवूडमध्येही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. २०२१ मध्ये सुर्याचा ‘जयभीम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याची जगभरात चर्चा झाली होती. या चित्रपटाची ऑस्करसाठीही निवड करण्यात आली होती. परंतु चित्रपटाला हा पुरस्कार मिळू शकला नाही. परंतु आता ऑस्करने अभिनेता सुर्याला अकडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स एंड साइसेंस तर्फे जाहीर केलेल्या ३९७ मान्यवरांच्या यादीत स्थान दिले आहे. असा सन्मान मिळवणारा तो एकमेव साऊथ अभिनेता आहे.

दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दिशा शेवटची मोहित सूरीच्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये दिसली होती. आता येत्या काही दिवसांत ती ‘वॉरियर’, ‘क्टिना’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सोनाक्षीची लागली लॉटरी; परदेशातून मिळणार तब्बल 29 लाख, पाहा काय आहे प्रकरण?

यंदाचा ‘बिग बॉस’ होणार खूपच खास, ‘हे’ कलाकार घालणार राडा, पाहा पहिली यादी

हे देखील वाचा