TMKOC | कोमल भाभी कॉलेजच्या दिवसांत होती खूपच ‘स्लिम ट्रिम’, फोटो पाहून ओळखणंही होईल कठीण

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात हिट आणि लोकप्रिय शोपैकी एक आहे. या शोने टीआरपीच्या बाबतीत सर्वांनाच मागे टाकले आहे. या शोमधील प्रत्येक पात्र चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. या शोची लोकप्रियता केवळ देशापुरती मर्यादित नाही, तर परदेशातही या शोमधील प्रत्येक पात्राला आणि शोला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे. जेठालालपासून बबिता जीपर्यंत या शोमधील सर्व पात्रांनी आपापल्या पद्धतीने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. यापैकी एक म्हणजे ‘तारक मेहता’ची कोमल वहिनी होय. या शोमध्ये कमल भाबीची भूमिका अभिनेत्री अंबिका रांजणकरने (Ambika Ranjankar) साकारली आहे.

‘तारक मेहता’ (Tarak Mehta ka Ooltah Chashmah) मालिकेत अंजली भाबी डॉक्टर हाथीच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, शोमध्ये तुम्हाला वजनदार दिसणारी कोमल हाथी तिच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये खूप स्लिम ट्रिम होती.

अभिनेत्री अंबिका रांजणकरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीचे हे फोटो खूप जुने आहेत. तिने स्वत: काही काळापूर्वी हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तीच तारक मेहताची कोमल हाथी आहे की, नाही हे ओळखणे कठीण आहे. फोटोमध्ये सलवार सूट घातलेल्या अभिनेत्रीचे हे फोटो तिच्या कॉलेजच्या दिवसातील आहेत.

अंकिताचा हा फोटो पाहून चाहत्यांकडून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. हा फोटो शेअर करताना अंजलीने स्वतः तिच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण करून देत एक भावनिक नोट लिहिली आहे. नुकतेच जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांचे काही जुने फोटो व्हायरल झाले होते, ज्यामध्ये अभिनेता खूपच तरुण दिसत होता.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टीव्हीवरील नंबर वन कॉमेडी मालिका आहे. ही मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील साधी आणि मजेदार कथा चाहत्यांना आवडते. विशेष म्हणजे, या कथेत दिसणारे पात्रंही आपल्या दमदार अभिनयामुळे चाहत्यांमध्ये अधिराज्य गाजवतात.

Latest Post