Tuesday, September 26, 2023

ऐश्वर्यापासून ते शाहरुखपर्यंत ‘या’ कलाकारांच्या चित्रपटात झळकलीय ‘दयाबेन’, बी ग्रेड सिनेमातही केलं होतं काम

अभिनेत्री दिशा वकानी ही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोद्वारे घराघरात पोहोचली आहे. त्याचबरोबर ती ‘दयाबेन’ या नावाने प्रसिद्ध झाली आहे. याच दयाबेनचा गुरूवारी (17 ऑगस्ट) वाढदिवस आहे. दिशाने आपल्या करिअरची सुरुवात गुजराती रंगभूमीतून केली आहे. दिशाने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रत्येक व्यक्तीवर आपली जादू केली आहे. आज दिशाच्या वाढदिवसानिमित्त या लेखातून जाणून घेऊया तिच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक किस्से.

दिशा वकानीचा जन्म 17 ऑगस्ट 1978 रोजी गुजरात मधील अहमदाबाद येथे झाला. दिशाला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमधून तिच्या अभिनयाने आणि बोलण्याच्या पद्धतीने टीव्हीची ‘कॉमेडी क्वीन’ म्हणून ओळख मिळाली. परंतु या शोच्या अगोदर दिशाने खूप संघर्ष केला होता. याचबरोबर हे यशाचे शिखर गाठण्यासाठी दिशाला खूप मेहनत घ्यावी लागली, पण काही चाहत्यांना हे माहिती नाही की, दिशाने काही काळापूर्वी बी ग्रेड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. दिशा 1997 मध्ये ‘कामसिन: द अनटच’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात दिशाने अतिशय बोल्ड सीन्स दिले होते. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame ‘Dayaben’ did the same in the film besides the series)

ऐश्वर्या रायपासून ते शाहरुख खानपर्यंत ‘या’ कलाकारांसोबत केलंय काम
त्याचबरोबर दिशाने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि ऋतिक रोशनच्या ‘जोधा अकबर’ या चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटात दिशाने ऐश्वर्याच्या दासीची भूमिका निभावली होती. परंतु दिशाची भूमिका यात फारशी नव्हती. म्हणूनच ही भूमिका कोणाच्या लक्षातही नाही. ‘जोधा अकबर’ व्यतिरिक्त दिशा ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्या ‘देवदास’ चित्रपटातही दिसली होती. हा चित्रपट सुपरहिट चित्रपट ठरला होता.

त्याचबरोबर दिशाने आमिर खानच्या ‘मंगल पांडे’या चित्रपटातही काम केले होते. दिशाने चित्रपटात एका वेश्याची किरकोळ भूमिका केली होती. या चित्रपटात दिशाला पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट खूप काळजीपूर्वक पाहावा लागेल. सुपरस्टार अभिनेता अनुपम खेर यांच्या ‘नॉट सो पॉप्युलर’ चित्रपट ‘सी कोकंपनी’मध्येही दिशा दिसून आली होती. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली होती. त्याचबरोबर या चित्रपटात दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती, तुषार कपूर आणि इतर अनेक कलाकार देखील होते, तर दिशाने या चित्रपटात एका विधवा महिलेची भूमिका निभावली होती.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या दिशाने प्रियांका चोप्रा आणि हरमन बावेजाच्या ‘लव्ह स्टोरी 2050’ मध्ये मोलकरणीची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे जेठालाल गडा म्हणजेच दिलीप जोशी देखील या चित्रपटात दिसले होते.

अधिक वाचा-
फक्त 250 रुपये होता ‘दयाबेन’चा पहिला पगार; रक्कम मिळताच ठेवली होती ‘या’ व्यक्तीच्या हातावर
‘हा माझा मार्ग एकला’ म्हणणाऱ्या सचिनजींनी 61 वर्षांच्या करिअरमध्ये तयार केली असंख्य नाती, आजही गाजवतायेत सिनेसृष्टी

हे देखील वाचा