Saturday, July 6, 2024

TMKOC प्रिया अहुजा उर्फ रिटा रिपोर्टरने पहिल्यांदाच नवऱ्याच्या आणि स्वतःच्या शो सोडण्यावर केले भाष्य

बहुतकरून फक्त विनोदासाठी ओळखला जाणारा ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ हा शो मागील काही दिवसांपासून वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आला आहे. मधल्या काळापासून या शोमधील अनेक कलाकार या ना त्या कारणामुळे सतत शो सोडून जात आहे. शोमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी या शोला ठोकलेला रामराम प्रेक्षकांसाठी देखील चांगलाच धक्कादायक होता. मुख्य बाब म्हणजे या शोच्या कलाकारांसोबतच शोच्या दिग्दर्शकांनी देखील हा शो सोडला. शो सोडणाऱ्या कलाकारांमध्ये रिटा रिपोर्टर सुद्धा आहे. रिटा अर्थात प्रिया अहुजाने देखील हा शो सोडला. प्रिया ही याच शोचे दिग्दर्शक असलेल्या मालव राजदा यांची पत्नी असून, मालव यांनी देखील नुकताच शो सोडला आहे.

मालव राजदा यांनी तब्बल १४ वर्ष या शोचे दिग्दर्शन केले. रिटा रिपोर्टर ही भूमिका देखील शोमध्ये सुरुवातीपासून होती त्यामुळे प्रिया शोमध्ये होतीच. त्यांनी अनेक वर्ष डेटिंग केले आणि नंतर लग्न केले. प्रियावर अनेकदा मालव यांच्यामुळे तिला ही भूमिका मिळाल्याचा आरोप देखील लागला. मात्र आता तिने यासोबतच अनेक गोष्टींबद्दल तिचे मत व्यक्त केले आहे.

अभिनेत्री प्रिया अहुजाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, “मालवसोबत माझ्या लग्नाला १३ वर्ष झाले. मला या शोमध्ये भूमिका मिळाली याचा मालवशी काहीही संबंध नाही. या शोने मला आणि मालवला करियरमध्ये खूप काही दिले. तारक मेहता नंतर माझे काम अधिकच उत्तम झाले आणि मालवसोबत देखील असेच झाले. तो तर आधीच विनम्र आहे, कारण याच शोमुळे आम्ही भेटलो आणि आमचे लग्न झाले.”

तत्पूर्वी रिटा रिपोर्टर ही २०१९ पासून शोमधून गायब आहे. तिने थोडा काळ शोमधून ब्रेक घेतला. मात्र ती अजूनपर्यंत परत आलेली नाही. तिने अजूनपर्यंत शोला रामराम ठोकला नाही. मात्र सध्या तिचा शोमध्ये काही रोल नाही. जेव्हा तिचा रोल येईल तेव्हा प्रोडक्शनकडून सांगितले जाईल आणि ती नक्की शूट करेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
यालाच म्हणतात खरे प्रेम! शून्य डिग्री तापमानात उमेश कामतने प्रियासाठी दिली प्रेमाची परीक्षा

मल्याळम सिनेमातील पहिल्या अभिनेत्री असूनही पीके रोझी यांनी ‘या’ कारणामुळे काढले त्यांचे संपूर्ण आयुष्य अज्ञानात

हे देखील वाचा