तुम्ही ‘तारक मेहता…’चे चाहते आहात? मग ओळखून दाखवा या जुन्या फोटोमध्ये तुमचे आवडते कलाकार

गेल्या १३ वर्षांपासून भारतीय टेलिव्हिजनवर वर्चस्व गाजवणारा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा कॉमेडी शो ज्यांना आवडतो, त्यांच्यासाठी आज एक विशेष आव्हान समोर आले आहे. शोमध्ये बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारियाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या टीमचा एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून कलाकारांना ओळखणे, हा मोठा टास्क झाला आहे.

कोण-कोण आहे फोटोत
या फोटोबद्दल बोलताना, येथे काही कलाकार एका सुंदर समुद्रकिनाऱ्यावर उभे आहेत. पण तुम्ही ओळखले का की, या फोटोत बाघा, जेठालाल, बाबूजी आणि असे अनेकजण आहेत, जे आज तुमचे आवडते कलाकार आहेत. हा फोटो हे देखील सांगत आहे की, या शोची टीम एका कुटुंबासारखी आहे जी वर्षानुवर्षे एकत्र काम करत आहे. हे सर्व कुटुंबातील सदस्याप्रमाणे एकमेकांच्या जुन्या आठवणी जपून ठेवतात.

View this post on Instagram

A post shared by Tanmay vekaria (@tanmayvekaria)

फोटोत बापूजी कुठे आहेत?
या फोटोबद्दल बोलताना जेठालाल अर्थात दिलीप जोशी लाल रंगाच्या टी-शर्टसह पांढऱ्या रंगाच्या पॅन्टमध्ये दिसत आहेत. त्याचवेळी बापूजी अर्थात अमित भट्ट त्यांच्या मागे उभे आहेत. तर बाघा म्हणजेच तन्मय कोपऱ्यात टोपी घातलेला दिसतो. मजेशीर गोष्ट म्हणजे तन्यमला स्वतः त्याच्या चाहत्यांना सांगावे लागेल की, तोही या फोटोत आहे. हा फोटो शेअर करताना तन्मय वेकारियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील आणखी एक फोटो ……”

यापूर्वीही शेअर केला होता एक थ्रोबॅक फोटो
पहिल्यांदाच तन्मयने त्याच्या आठवणींचा बॉक्स उघडला नाही, तर अलीकडेच त्याने आणखी एक थ्रोबॅक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत दयाबेन म्हणजेच दिशा वकानी आणि कोमल हाथी म्हणजेच अंबिका रांजणकर तन्मय वेकारियासोबत दिसत आहेत. प्रत्येकजण या फोटोत खूप आनंदी दिसत आहे. हा फोटो पोस्ट करण्याबरोबरच, तन्मयने कॅप्शनमध्ये लिहिले, “२००८ मध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या कमल पटेल विरुद्ध धमाल पटेल या सुपरहिट गुजराती नाटकासह अमेरिकेची आणखी एक संस्मरणीय ट्रिप.”

View this post on Instagram

A post shared by Tanmay vekaria (@tanmayvekaria)

View this post on Instagram

A post shared by Tanmay vekaria (@tanmayvekaria)

१३ वर्षांचा प्रवास
उल्लेखनीय आहे की, सिटकॉम ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ १३ वर्षांपासून प्रसारित होत आहे. शोमधील प्रत्येक पात्राला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळते. हा शो दररोज समाजात जागरुकता निर्माण करतो आणि देशाच्या विविध भागांची संस्कृती एकाच सोसायटीत सादर करतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘चंपकलाल’ १४ वर्षांपूर्वी होते खूपच तरुण; फोटोतील ‘बापूजीं’ना ओळखणेही कठीण

-अफेअरच्या चर्चांमध्ये व्हायरल होतोय बबिताजी अन् टप्पूचा ‘असा’ फोटो, पाहून जेठाही होईल लालबुंद

-TMKOC: बबिताजीचा ‘दीवाना’ जेठा, अय्यरसमोरच बोलला तिला ‘I Love You!’, मग पुढं जे झालं…

Latest Post