अफेअरच्या चर्चांमध्ये व्हायरल होतोय बबिताजी अन् टप्पूचा ‘असा’ फोटो, पाहून जेठाही होईल लालबुंद

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा टेलिव्हिजनवर येणारा प्रेक्षकांचा सर्वात आवडता कॉमेडी शो आहे. यामुळेच गेल्या १३ वर्षांपासून हा शो छोट्या पडद्यावर राज्य करत आहे. शोमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या हृदयात घर करून आहे. त्याचवेळी, बबिता जी अर्थात मुनमुन दत्ता आणि राज अनादकट यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Raj Anadkat (@raj_anadkat)

मुनमुन आणि राज यांचा हा फोटो एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. फोटोमध्ये दोघांनीही एकमेकांचे हात धरलेले दिसत आहेत. सोबतच ते यात हसत हसत कॅमेराकडे पाहून पोझ देत आहेत. दोघांचा हा फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यांच्यामध्ये अफेअर असल्याचा अंदाज चाहते पुन्हा लावू लागले आहेत. (taarak mehta ka ulta chashma munmun dutt poses with raj anadkat picture goes viral on social media)

View this post on Instagram

A post shared by Jethalaal (@jethiyafans)

सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये मुनमुन दत्ताने ऑरेंज आणि क्रीम कलरचा फ्लोरल प्रिंट टॉप घातलेला दिसत आहे. तर राज पांढऱ्या आणि राखाडी रंगाच्या हुडी टी-शर्टमध्ये दिसत आहे. यातील दोघांची स्माईल पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकत आहे. फोटो पाहून एका बाजूला दोघांचे चाहते खूप आनंदी दिसत आहेत. त्याचबरोबर अनेक युजर्स त्यांना ट्रोल देखील करतानाही दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज अनादकटच्या अगोदर ‘या’ अभिनेत्याशी जोडलं जायचं मुनमुन दत्ताचं नाव, पण नंतर तिने…

-शो सोडल्याच्या चर्चांवर मुनमुन दत्ताने लावला पूर्णविराम; म्हणाली, ‘…तुम्हाला खरं जाणून घेण्याचा अधिकार आहे’

-उर्वशी रौतेलानंतर आता मुनमुन दत्तानेही केली ‘मड बाथ’; जॉर्डनमधील फोटो होतायेत व्हायरल

Latest Post