[rank_math_breadcrumb]

भावपूर्ण श्रद्धांजली ! तमिळ अभिनेता मदन बॉब यांचे निधन

७१ वर्षीय मदन बॉब हे बऱ्याच काळापासून कर्करोगाने ग्रस्त होते. कर्करोगाशी झुंज देत असताना शनिवारी त्यांचे निधन झाल्याचे अभिनेत्याच्या कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले. तमिळ चित्रपटांमध्ये ते त्यांच्या आनंदी चेहऱ्यासाठी आणि हास्यासाठी ओळखले जात होते. मदन बॉब यांनी अनेक प्रसिद्ध दक्षिण भारतीय कलाकारांसोबतही काम केले होते.

मदन बॉब यांचे खरे नाव एस कृष्णमूर्ती होते. त्यांनी कमल हासन, रजनीकांत, अजित कुमार, सूर्या यांसारख्या प्रसिद्ध दाक्षिणात्य सुपरस्टार्ससोबत काम केले. ते ‘असथा पोवाथु यारू?’ या लोकप्रिय तमिळ कॉमेडी शोमध्ये जज म्हणूनही दिसले. मदन बॉब हे अभिनयासाठी ओळखले जात नव्हते, तर ते एक उत्तम संगीतकार देखील होते.

मदन बॉब यांनी ‘तेनाली’ आणि ‘फ्रेंड्स’ सारख्या तमिळ चित्रपटांमध्ये लोकप्रिय भूमिका साकारल्या होत्या. ते त्यांच्या विनोदाने प्रेक्षकांना हसवत असत. अभिनेत्याच्या मृत्यूच्या बातमीने चाहते खूप निराश झाले आहेत. चाहत्यांपासून ते तमिळ चित्रपट कलाकारांपर्यंत सर्वजण सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेत्याचे अंतिम संस्कार कधी होतील याची माहिती कुटुंबाने अद्याप शेअर केलेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचमध्ये आमिर खानचा दबदबा; युजर्स म्हणाले, ‘किलर लूक’
२७ वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय, पण मिळाली नाही मुख्य भूमिका; जाणून घ्या सुनील ग्रोव्हरचा अभिनय प्रवास