फक्त शर्ट घालून तारा सुतारियाने केले फोटोशूट, एकदा पाहाच तिचा ‘हा’ बोल्ड अवतार


प्रत्येक दिवशी आपले बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या मनात आग लावणारी अभिनेत्री म्हणजे तारा सुतारिया. तिचे फोटो पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल. तसेच तिचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. त्यामुळे फोटो व्हायरल व्हायला तसा फारसा वेळ देखील लागत नाही. त्यामुळे सर्वांच्या तोंडात आजकाल तिचेच नाव असते. यातच तिचा आणखी एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या फोटोमध्ये तिने केवळ एक शर्ट घातला आहे. ( Tara sutaria share bold photo on social media from daboo Ratnani’s calendar)

ताराने शेअर केलेले हे फोटोशूट डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी केले आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ताराने केवळ पांढऱ्या रंगाचा एक शर्ट घातला आहे. यासोबतच तिने नी लेंथ टॅन बुट्स घातले आहेत. तिचा हा फोटो चाहत्यांना खूप पसंत पडला आहे.

ताराच्या या बोल्ड फोटोला 2 लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेक चाहते तिच्या या फोटोचे कौतुक करत आहेत. तिच्या एक चाहत्याने कमेंट केली आहे की, “खूप सुंदर.” दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट केली आहे, “माय गर्ल इज ऑन फायर.”

ताराच्या आधी टायगर श्रॉफ, आलिया भट्ट, विकी कौशल, विद्या बालन, अभिषेक बच्चन, कियारा आडवाणी, सनी लिओनीसोबतच अनेक कलाकारांनी डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे. या सगळ्या कलाकारांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

तारा सुतारिया तिच्या बोल्ड फोटोप्रमाणे देशी अंदाजात फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिने लेहंगा घालून फोटोशूट केले होते. जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

तारा सुतारिया हिने ‘स्टूडंट ऑफ द इअर 2’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अनन्या पांडे आणि टायगर श्रॉफ हे मुख्य भूमिकेत होते. यानंतर तिने सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मरजावां’ या चित्रपटात काम केले होते. ती ‘तडप’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती टायगर श्रॉफसोबत ‘हीरोपंती 2’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्रीने घातला विचित्र ड्रेस; नेटकरी म्हणाले, ‘आज समजले आपल्या देशात…’

-‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने केला लॉस एंजेलिसमधील आलिशान घरासोबतचा झक्कास फोटो शेअर; किंमत वाचून येईल चक्कर

-अदा शर्माचे विचित्र अंदाजातील फोटो व्हायरल; विचारला असा प्रश्न की, नेटकरीही झाले हैराण


Leave A Reply

Your email address will not be published.