माझा होशील ना या मालिकेतून समोर आलेला चेहरा म्हणजे अभिनेता आशय कुलकर्णी. या मालिकेतून पदार्पण केल्यावर आशयने इतरही अनेक चित्रपट मालिका आणि नाटकांतून कामे केली.पण आता तो एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी एका मालिकेत काही भागांत काम केल्यानंतर त्याला वेळेत त्याचे पैसे मिळाले नाही. याविरोधात त्याने आता आवाज उठवला आहे. सोशल मिडीयावर पोस्ट करताच त्याला मात्र त्याचे मानधन मिळाले.
यावर संवाद साधताना आशय म्हणाला, मालिकेत काम करताना कलाकाराचं मानधन ९० दिवसांनी मिळायला सुरुवात होते. पण यातही जेव्हा दिरंगाई व्हायला लागते तेव्हा कलाकारांना सुद्धा अडचणी येतातच की. याआधी मला नेहमीच वेळेत मानधन मिळाले आहे. मात्र इतक्या वर्षानंतर मला पहिल्यांदाच याबाबत आवाज उठवण्याची गरज भासली. आधीच मालिकेचे पैसे ९० दिवसांनी दिले जातात. पण जेव्हा हेच अंतर १२० तर कधी १४० तर कधी त्याहून जास्त दिवस होतात. आशावेळी कलाकारांनी काय करायचं?
‘हे हिरो – हिरोईन आहेत यांना काय पैशांची कमी नसते’.असंच लोकांना वाटतं.पण आम्हला सुद्धा आमचे महिन्याचे खर्च असतात. जर कामाच्या बाबतीत कलाकार प्रामाणिक आहे, तर मग त्याला पैसे सुद्धा तसेच वेळेत मिळायला हवे ना.
आशय पुढे म्हणाला, मी काही अप्रतिम प्रोडक्शन हाउसेस मध्ये कामे केली आहेत. सध्या यांचा जरी काही प्रोब्लेम झाला असेल तरी मी माझं जगणं काही थांबवू शकत नाही. ते मला चालवायचं आहे. टेलीव्हिजनचा काही सगळाच अनुभव वाईट नाही. मी काही कुणाला भीती घालत नाहीये. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार आहे.
आशय कुलकर्णी सध्या ‘सुख कळले’ या मालिकेत काम करतोय. याआधी तो ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत देखील दिसला होता. ‘सुख कळले’ या मालिकेत त्याची आणि स्पृहाची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
प्रियांकाला आली मुंबईची आठवण! घरी पोचताच इन्स्टाग्रामवर शेयर केल्या आठवणी…