Saturday, September 30, 2023

‘सिंगल’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘हे’ कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

आजकाल कोणी ‘एकटं’ असलं की, लोकांच्या भुवया लगेच उंचावतात. लग्न झालंय की नाही? सिंगल की कमिटेड? अशा प्रश्नांचा भडिमार सुरु होतो. आणि जर या दोन्ही प्रश्नांची उत्तर नकारार्थी, असतील तर विचारूच नका..!! अशा ‘सिंगल’ असलेल्यांच नेमकं काय होतं? त्यांना कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं? हे दाखवणारा ‘सिंगल’ हा धमाल मराठी चित्रपट २७ ऑक्टोबरला आपल्या भेटीला येतोय. या चित्रपटाचं एक आकर्षक पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालंयं.

पोस्टर मध्ये एक लालचुटूक हृदय पहायला मिळतंय. ते कोणाचं आहे? त्याचं काय म्हणणं आहे ? हे जाणून घेण्यासाठी दिग्दर्शक चेतन चावडा आणि सागर पाठक यांचा ‘सिंगल’ (Singal)हा चित्रपट आपल्याला पहावा लागेल. चित्रपटातील कलाकारांची नावे गुलदस्त्यात असल्यामुळे चित्रपटात कोण कलाकार असणार? याची उत्सुकता ही लागून राहिली आहे.

तरुण प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनासाठी आम्ही ‘सिंगल’ हा चित्रपट आणला आहे. ‘सिंगल’ असलेल्या आणि नसलेल्या प्रत्येकाला हा चित्रपट धमाल अनुभव देईल, असा विश्वास दिग्दर्शक व्यक्त करतात.

किरण काशिनाथ कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, शरद पाटील, अमोल कागणे, गौरी सागर पाठक, ‘सिंगल’ हे या चित्रपटाचे निर्माते असून सह-निर्माते सुमित कदम आहेत. चित्रपटाचं लेखन सतीश समुद्रे यांचे असून पटकथा चेतन चावडा, सागर पाठक आणि सतीश समुद्रे यांची आहे. अभिजीत कवठाळकर, मोहित कुलकर्णी यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे. (The Marathi film Singal is coming to our audience on October 27)

अधिक वाचा-
सनी देओलने केले भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन; रोहित शर्माचा फोटो शेअर करत म्हणाला…
अभिनेत्री पूजा हेगडेच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा; फोटो व्हायरल

हे देखील वाचा