Friday, April 19, 2024

नेहा कक्करचा ‘बेबी बंप’ पाहून सासूही झाली होती चकित; प्रतिक्रिया देत म्हणाली, ‘इतक्या लवकर…’

टीव्हीचा सुप्रसिद्ध शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अनेक कलाकार आपली हजेरी लावत असतात. शोचा होस्ट कपिल शर्मा प्रत्येक एपिसोडमध्ये कलाकारांसोबत मज्जा मस्ती करताना दिसतो. त्याचबरोबर चाहत्यांना हसवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. अशाच एक नवीन भागात एका भावा बहिणीच्या जोडीने हजेरी लावली होती. रविवारी (२६ सप्टेंबर) सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि तिचा भाऊ टोनी कक्कर हे आले होते.

या दोघांनी कपिल शर्मासोबत शोमध्ये खूप मज्जा मस्ती केली. यावेळी नेहा कक्करनेही अनेक मजेदार गोष्टी शेअर केल्या. ‘ख्याल रख्या कर’ या गाण्याच्या प्रमोशनल फोटोमध्ये नेहा गर्भवती दिसत आहे. हे पाहून तिचे चाहते, कपिल शर्मा आणि अगदी तिच्या सासूनेही ती गर्भवती असल्याबद्दल विचारले. इतकेच नव्हे, बऱ्याच जणांनी तिचे अभिनंदन देखील केले. यानंतर नेहा कक्करने जे शेअर केले, ते तर आणखी मजेशीर होते.

नेहा कक्कडने सांगितले की, “तिची सासूसुद्धा बेबी बंप पाहून आश्चर्यचकित झाली आणि तिने देखील अभिनंदन केले.” यावर, कपिल शर्मा म्हणाला की, तो देखील तिच्या इंस्टाग्राम पोस्टला बळी पडला होता. त्याने देखील नेहाचे वैयक्तिकरित्या अभिनंदन केले होते.

त्याचबरोबर, नेहाने सांगितले की, “बेबी बंप पाहून माझी सासू म्हणाली, ‘बेटा, आनंदाची बातमी जरा जास्तच लवकर दिली नाहीस का!’ मी म्हणाले की, ‘मम्मी तुम्ही तरी असे बोलू नका, तुम्हा सर्वांना माहीत आहे, आमचे नुकतेच लग्न झाले आहे, आम्ही नुकतेच भेटलो आहोत.’ काही लोकांना असेही वाटले की, मी आणि रोहनने लग्न घाईघाईने यासाठी केले, कारण मी ती अगोदरच गर्भवती होते.”

२०२० मध्ये झाले लग्न
गायिका नेहा कक्कर आणि गायक रोहनप्रीत सिंग यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एकमेकांना पती – पत्नी म्हणून स्वीकारले. गेल्या वर्षी दोघांची भेट एका गाण्याच्या दरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांनी लग्न केले. डिसेंबरमध्ये त्यांचा ‘ख्याल रख्या कर’ हा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला. यामध्ये नेहा आणि रोहन दोघे ही एकत्र दिसून आले. जेव्हा तिने बेबी बंपसोबत हे फोटो शेअर केले, तेव्हा सर्वांना वाटले की, ती गर्भवती आहे.

नेहाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. तिने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. ती एकामागून एक नवीन गाणी आणि म्युझिक व्हिडिओ लाँच करत राहते. तिची फॅन फॉलोइंग देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नेहाच्या इंस्टाग्रामवर ६० मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा महेश भट्ट यांना समजवण्यासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या परवीन बाबी, मग पुढे…

-Netflix TUDUM: माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू, तर ‘अरण्यक’च्या धमाक्यासह ‘या’ प्रोजेक्ट्सची झाली घोषणा

-सिनेमागृह सुरू करण्यास शासनाचा हिरवा कंदील, तरीही ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शनाची तारीख लांबणीवरच

हे देखील वाचा