अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि झाबवा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘डेट भेट‘ या आगामी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच सोशल मीडियावर करण्यात आले. सोनाली कुलकर्णी , हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘डेट भेट’ 14 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.
‘डेट भेट’ (Date Bhet) चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन लोकेश विजय गुप्ते यांचे आहे, तर पटकथा व संवाद लेखन अश्विनी शेंडे यांनी केले आहे. यासाेबतच प्रदीप खानविलकर हे सिनेमॅटोग्राफर आहेत. ‘डेट भेट’ ची निर्मिती शिवांशु पांडे, हितेश रुपारेलिया आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे. निनाद नंदकुमार बत्तीन, तबरेज पटेल, प्रशांत शर्मा, हनी शर्मा यांनी सह निर्मिती केली आहे तसेच असोसिएट निर्माते प्रशांत शेळके हे आहेत. सिनेमाचे संगीत ‘व्हिडिओ पॅलेस’ या म्युझिक लेबल द्वारे प्रदर्शित होत आहे, तर चित्रपटाचे डिस्ट्रिब्युशन फ़िल्मअस्त्रा स्टुडिओज करत आहेत.
View this post on Instagram
अशात चाहते ‘डेट भेट’मध्ये साेनाली कुलकर्णी अन् संताेश जुवेकर यांना स्क्रिनवर एकत्र पाहण्यासाठी प्रचंड उत्साही आहेत.(The new poster of Santosh and Sonali’s ‘Datebhet’ caught the attention of the fans, the film will be released on this day)
अधिक वाचा-
गरोदर सना खानची ‘अशी’ झालीये अवस्था, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल
‘मिस यू..,’ म्हणत मुग्धा वैशंपायनने काढली प्रथमेश लघाटेची आठवण; म्हणाली…