Wednesday, February 5, 2025
Home भोजपूरी ‘रात कईल चढाई ए राजा’ या अंकुश राजाच्या बोल्ड एँड ग्लॅमर्स गाण्याने जिंकले चाहत्यांचे मन

‘रात कईल चढाई ए राजा’ या अंकुश राजाच्या बोल्ड एँड ग्लॅमर्स गाण्याने जिंकले चाहत्यांचे मन

गायक अंकुश राजा हा भोजपुरी इंडस्ट्रीमधील उत्कृष्ट गायक आहे. त्याच्या उत्कृष्ट गायनाबरोबरच त्याच्या अभिनयासाठी ही खूप प्रसिद्ध आहे. अनेक सुपरहिट गाण्यांमध्ये त्याचे आणखी एक गाणं रिलीज झाले आहे. जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. त्याच्या ‘राटे कईल चढाई ए राजा’ या नवीन गाण्याचा व्हिडिओ यूट्यूबवर रिलीज झाला आहे. यामध्ये रोमान्सची जबरदस्त छटा आहे. यावेळी त्याचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

गायक अंकुश राजाचे नवीन भोजपुरी गाणं ‘रात कईल चढाई ए राजा’ भोजपुरी म्युझिक वर्ल्डच्या यूट्यूब चॅनेलवर रिलीज करण्यात आले आहे. यामध्ये अभिनेत्री तिच्या सह-अभिनेत्यासह बरीच रोमँटिक शैली दर्शवत आहे. यासह, त्यांचा डान्स पाहून लोकं वेडे होत आहेत. यामध्ये अभिनेत्रीचा अतिशय बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहेत. या गाण्याला अंकुश राजाने आपला आवाज दिला असून, गाण्याला संगीत प्रियांशु सिंग यांनी दिले आहे.

या गाण्याचे संगीत अप्रतिम असून, या गाण्याचे चित्रीकरण ही खूप धमाकेदार आहे. आर्यन देव हे ‘रात कईल चढाई ए राजा’ चे व्हिडिओ दिग्दर्शक आहेत. तो त्याच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी ओळखला जातो. रिलीज झाल्यानंतर अल्पावधीतच या गाण्याला एक लाखाहून अधिक व्ह्यूज आणि २ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. अंकुशच्या या गाण्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच अंकुश राजाच्या कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने ‘मेरो कान्हा’ हे गाणं आले होते. चाहत्यांना हे गाणं खूप आवडले होते. यामध्ये त्याने मखानच्या केकसह एक व्हिडिओ शूट केला होता. त्याच्या या व्हिडिओला भोजपुरीया प्रेक्षकांचा ही प्रचंड प्रतिसाद मिळाला. हे गाणे अजून ही ऐकले जात आहे. या ही गाण्याला चाहत्यांकडून खूप लाइक्स मिळाले आहेत.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सई ताम्हणकरचा समुद्रात जलवा; चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

-‘नुसती क्यूट आहेस तू’, म्हणत वीणा जगतापच्या फोटोवर चाहत्याने केली लक्षवेधी कमेंट

-‘आये… तुझं हसणं हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई’, म्हणत सिद्धूकडून आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा