तुम्ही अनेकांच्या तोंडून ‘छपरी‘ हा शब्द ऐकला असेलच. समाजाच्या दृष्टीने विचित्र किंवा वाईट फॅशन सेन्स असलेल्या लोकांसाठी हा शब्द विशेषतः वापरला जातो. शुक्रवारी (16 जून) ‘आदिपुरुष‘ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर ‘छपरी’ शब्द खूप ट्रेंड करू लागला आहे. पण सध्या ‘छपरी’ हा शब्द का व्हायरल होत आहे आणि त्याचा ‘आदिपुरुष‘ चित्रपटाशी संबंध आहे तरी काय? चला जाणून घेऊया.
‘छपरी’ म्हणजे काय?
गुगलवर ‘छपरी’ शब्द सर्च केल्यानंतर अर्बन डिक्शनरी पेजवर त्याचा अर्थ दाखवल जात आहे. छपरी म्हणजे बेजबाबदार व्यक्ती. अशी व्यक्ती जी ट्रेंडी लूकसह वेगळी दिसते. त्या व्यक्तीचा पेहराव इतरांपेक्षा वेगळा असतो. सोशल मीडियावर त्याचे काम इतर लोकांना त्याच्याकडे आकर्षित करणे इतकेच असते. अत्यंत भडक रंगाचे कपडे, भडक प्रकारचे शूज वापरने किंवा विचित्र हेअर स्टाईल करणे याला छपरी म्हटलं जातं.
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपट रामायणावर आधारित आहे. या चित्रपटात प्रभास भगवान रामची, कृती सेनन सीतेची आणि सैफ अली खान रावणची भूमिका साकारताना दिसत आहेत. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रेक्षकांना या चित्रपटतील पात्र आवडली नाहीत. त्यामुळे अनेकांनी या चित्रपटाला ‘छपरी’ चित्रपट म्हटले आहे. तसेच काहींनी यावर मीम्स देखील तयार केले आहेत. आदिपुरुष या सिनेमाचा पहिला शो बघितल्यानंतर लोक या चित्रपटात छपरी भाषेचा उपयोग करण्यात आला आहे, अशी टिका करत आहेत.
दरम्यान, ‘आदिपुरुष’चे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. अशात हा चित्रपट 16 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. तेलगू, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये हा चित्रपट रिलीझ झाला आहे. सध्या सोशल मीडियावर हा चित्रपट चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. (The word chhapri and adipurush film concation what is the meaning of chhapri mhsp)
अधिक वाचा-
–झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’चा टिझर रिलीज, स्टारकिड्सच्या धमाल शैलीने जिंकली चाहत्यांची मने
–“आधुनिकता आणि पौराणिक कथांच्या..”,’आदिपुरुष’ चित्रपटावर अरुण गोविल यांनी सोडलं मौन