लय भारी! रियॅलिटी शोच्या माध्यमातून ‘या’ कलाकारांनी धमाकेदार कमबॅक करत मिळवली तुफान प्रसिद्धी


या मनोरंजनसृष्टीच्या ग्लॅमर जगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठ्या संघर्षाची आणि मेहनतीची गरज असते. अतिशय मेहनतीने जेव्हा कलाकार स्वतः सिद्ध करतात आणि ओळख मिळवतात त्यानंतर खरा संघर्ष असतो तो मिळवलेली ओळख टिकवण्यासाठी. कारण या जगात वावरणाऱ्या लोकांची आणि प्रेक्षकांची स्मरणशक्ती खूपच कमी असते. त्यामुळेच ज्या कलाकारांना त्यांचे एक प्रोजेक्ट संपले की लगेच दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये झळकणे खूप गरजेचे असते. यातूनच ते लोकांशी जोडलेले राहतात आणि त्यांच्या स्मरणातही राहतात. काही विस्मरणात गेलेले कलाकार पुन्हा लाइमलाईट्मधे येण्यासाठी चांगल्या संधीच्या शोधात असतात. वेगवेगळे रियॅलिटी शो या कलाकरांना पुन्हा चर्चेत येण्यासाठी योग्य संधी असते. जाणून घेऊया असेच काही कलाकार ज्यांनी रियॅलिटी शोच्या माध्यमातून पुन्हा मिळवली त्यांची ओळख.

राहुल वैद्य :
इंडियन आयडलच्या पहिल्या पर्वात आपल्या गाण्याने सर्वांचीच मने जिंकणारा राहुल इंडियन आयडलनंतर काही दिवस खूपच चर्चेत राहिला नंतर मात्र तो विस्मरणात गेला. मात्र बिग बॉसच्या १४ व्या पर्वाने राहुलला पुन्हा एकदा लोकांसमोर आणले. या शोनंतर तो पुन्हा लोकप्रिय झाला. याच शोनंतर त्याला ‘खतरो के खिलाडी’ हा शोसुद्धा मिळाला.

रुबीना दिलैक :
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला अतिशय प्रसिद्ध चेहरा असणारी रुबीना, मालिकांमुळे खूपच लोकप्रिय होती. मात्र बिग बॉस १४ ने तिला अधिक लोकप्रियता मिळवून दिली.

राखी सावंत :
ग्लॅमर जगाची कॉंट्रोव्हर्सी क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत मधल्या काही काळात जणू इंडस्ट्रीमधून गायबच झाली होती. मात्र बिग बॉस १४ ने तिला एक आधार दिला या सृष्टीत ओळख नवीन दिली.

अभिनव शुक्ला :
अनेक मालिकांमध्ये मुख्य किंवा सहायक भूमिका साकारणारा अभिनव टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमधील काही सिनेमांमध्ये देखील दिसला. मात्र त्याला अपेक्षित यश मिळत नव्हते. म्हणूनतो हळूहळू लोकांच्या विस्मरणात गेला. रुबीनाशी लग्न झाल्यानंतर तो काही काळ चर्चेत आला, मात्र त्याचा त्याला काही फायदा झाला नाही. पण बिग बॉस १४ने त्याला तुफान लोकप्रियता मिळवली. तो सध्या ‘खतरो के खिलाडी’ या शोमध्ये दिसत आहे.

नेहा भसीन :
बॉलिवूडमधील गायिका असणाऱ्या नेहाला या बिग बॉस ओटीटी या शोने खूप लोकप्रियता मिळाली.

निक्की तांबोळी :
साऊथ सिनेसृष्टीला अभिनेत्री असलेल्या निक्कीला अपेक्षित ओळख मिळाली नव्हती. मात्र बिग बॉसने आता ती खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाली आहे.

राकेश बापट :
मराठी आणि हिंदी मधील अभिनेता असणारा राकेश अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसला आहे. मात्र त्याला मिळालेले यश हे तेवढ्या पुरतेच होते. मधल्या काळात राकेशलाही त्याची ओळख टिकण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते, मात्र बिग बॉस ओटीटीने त्याला अमाप लोकप्रियता मिळवून दिली.

या कलाकारांसाठी रियॅलिटी शो हे जणू तारणहारच ठरले.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज


Leave A Reply

Your email address will not be published.