Friday, April 26, 2024

कनिका कपूरपासून ते सैफ अली खानपर्यंत, ‘या’ स्टार्सच्या लग्नाला त्यांच्या मुलांनीही लावलीय हजेरी!

बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी एकापेक्षा जास्त लग्न केले आहेत. मजेशीर गोष्ट अशी आहे की यापैकी काही सेलेब्स असे आहेत, ज्यांची मुलंही त्यांच्या लग्नाला आली आहेत. म्हणजेच त्यांच्या पहिल्या लग्नातली मुलं त्यांच्या दुसऱ्या लग्नाला उपस्थित होती. एवढेच नाही, तर मुलांनी आई-वडिलांच्या लग्नात खूप धमालही केली आहे. या यादीत सैफ अली खानपासून ते श्वेता तिवारीपर्यंत अनेक सेलेब्सचा समावेश आहे.

कनिका कपूर (Kanika Kapoor)
गायिका कनिका कपूरने तिचा प्रियकर गौतमसोबत लग्न केले आहे. तिच्या लग्नाचा सर्वात सुंदर क्षण तो होता, जेव्हा तिच्या मुली चादर पकडून तिच्यासोबत मंडपात याल्या. इतकेच नाही, तर कनिकाच्या दोन्ही मुलींनी तिच्यासाठी खास परफॉर्मन्सही दिला. (these celebs kids attend their wedding)

सैफ अली खान (Saif Ali Khan)
सैफ अली खानने करीना कपूरसोबत दुसरे लग्न केले होते. करीना आणि सैफच्या लग्नात सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची मुले सारा अली खान आणि इब्राहिम यांनीही हजेरी लावली होती. एवढेच नाही, तर अमृताने स्वतः सारा आणि इब्राहिमला लग्नाला जाण्यासाठी तयार केले होते.

श्वेता तिवारी (Shweta Tiwari)
श्वेता तिवारीने पहिले लग्न राजा चौधरीशी केले होते. या लग्नापासून तिला पलक ही मुलगी आहे. राजासोबत घटस्फोटानंतर श्वेताने अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले. पलकनेही श्वेता आणि अभिनवच्या लग्नाला हजेरी लावली होती. श्वेताच्या लग्नात पलकने खूप डान्स केला होता.

दिया मिर्झा (Dia Mirza)
दिया मिर्झाने गेल्या वर्षी वैभव रेखीसोबत लग्न केले. वैभवला त्याच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगी असून, तिनेही या लग्नाला हजेरी लावली होती. दिया आणि वैभवच्या मुलीमध्ये चांगले बॉन्ड आहे. दिया तिला आपल्या मुलीप्रमाणेच प्रेम देते.

संजीव सेठ (Sanjeev Seth)
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या शोमध्ये अक्षराच्या वडिलांची भूमिका करणारे लोकप्रिय अभिनेता संजीव सेठ यांनी लता सब्रवालसोबत दुसरे लग्न केले. विशेष म्हणजे संजीवच्या दुसऱ्या लग्नाची तयारी त्यांची पहिली पत्नी रेशम टिपणीस आणि मुलांनी मिळून केली होती. पहिली पत्नी आणि मुलांची परवानगी घेऊनच संजीवने लताशी लग्न केल्याचेही सांगितले जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा