Wednesday, February 21, 2024

सनातन धर्माला ठेस पोहचवल्याबद्दल बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री अडचणीत, तिच्याविरोधात तक्रार दाखल

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सतत तिच्या अभिनयासोबतच, चित्रपटांसोबत तिच्या वक्तव्यांमुळे आणि तिच्या वादांमुळे मीडियामध्ये चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती अशाच एका वादामुळे लाइमलाईट्मधे आली आहे. तापसीविरोधात मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिच्यावर सनातन धर्माच्या प्रतिमेला ठेस पोहचवल्याचा आरोप करत ही तक्रार दाखल केली आहे. 

छत्रीपुरा पोलीस ठाण्याचे मुख्य असलेल्या SHO कपिल शर्मा यांनी सांगितले की, एकलव्य गौडद्वारा त्यांना एक आवेदन मिळाले होते, त्यात लिहिले होते की, एका फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करताना तिने लक्ष्मी देवीचे लॉकेट गळ्यात घातले होते आणि त्यासोबत एक रिव्हिलिंग ड्रेस घातला होता. या आवेदनात लिहिले होते की, त्या लॉकेटसोबत रिव्हिलिंग ड्रेस घालून तिने लोकांच्या भावनांना आणि सनातन धर्माला ठेस पोहचवली आहे. या प्रकरणात आता कायदेशीर कारवाई केली जात आहे.

taapsee-pannu

तापसी पन्नूला तिच्या स्पष्टवक्त्या स्वभावाची ओळखले जाते. ती प्रत्येक मुद्द्यावर खुलेपणाने तिचे मत मांडत असते. मात्र अजूनपर्यंत सनातन धर्माला ठेस पोहचवण्यासाठी तिच्यावर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर तिची काहीच प्रतिक्रिया आलेली नाही.

दरम्यान तापसीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती काही दिवसांपूर्वीच अनुराग कश्यप यांच्या ‘दोबारा’ सिनेमात दिसली होती. सिनेमाला काही खास प्रतिसाद मिळाला नाही. आता तापसी लवकरच शाहरुख खानसोबत ‘डंकी’ या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमात याच वर्षी शेवटी प्रदर्शित होऊ शकतो. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या सिनेमात पहिल्यांदाच तापसी आणि शाहरुख सोबत दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘उर्फी जावेद आहे ट्रान्सजेंडर’, ‘कोर्टातही सिद्ध करणार’, मॉडेलच्या दाव्याने सर्वत्र खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण
दोन-दोन वेळा संसार थाटणारे मराठी कलाकार आहेत तरी कोण?

हे देखील वाचा