खूपच वाईट! काजोलपासून ते आमिर खानपर्यंत, ‘या’ कलाकारांनी गमावलंय त्यांचं मूल


बॉलिवूड कलाकारांचे व्यावसायिक आयुष्य सर्वांनाच भावते. पण या चकाकणाऱ्या आयुष्यमागेही काही वेदनादायक किस्से असतात, जे हे कलाकार कधीही व्यक्त करू शकत नाहीत. क्वचितच जणांना माहिती असेल की, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या मुलांचा मृत्यू त्यांच्यासमोर झाला. जाणून घेऊया या कलाकारांबद्दल…

गोविंदा (Govinda)
अनेकदा आपण कॉमेडियन स्टार गोविंदाला चाहत्यांना खळखळून हसवताना पाहिले आहे, पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याने काय गमावले याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. गोविंदाने त्याची ४ वर्षांची मुलगी गमावली, हे क्वचितच लोकांना माहिती असेल. त्याची ही मुलगी वेळेच्या अगोदर जन्मली होती. त्यामुळे तिच्या आयुष्याचा प्रवास छोटाच ठरला. (bollywood celebrities govinda kajol aamir khan whose children died)

काजोल (Kajol)
बी-टाऊनची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल देखील अशाच एका दुःखातून गेली आहे, ज्यावेळी तिने विचार केला होता की, आता आपल्या आयुष्यात काहीही उरले नाही. २०११ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री काजोलने एक्टोपिक गर्भधारणा केली होती. त्यानंतर तिचा गर्भपात झाला.

आमिर खान (Aamir Khan)
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आज तीन मुलांचा बाप आहे. एक काळ असा होता, जेव्हा त्याने आपले एक मूल गमावले होते. आमिर खानची पत्नी गरोदर होती, पण काही कारणाने तिचा गर्भपात झाला. यानंतर आमिर बरेच दिवस उदास आणि एकटा राहिला.

प्रकाश राज (Prakash Raj)
दक्षिण आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध स्टार प्रकाश राज यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

त्यांना ५ वर्षांचा मुलगा होता, जो एका अपघातात मरण पावला. एके दिवशी त्यांचा मुलगा गच्चीवर पतंग उडवत होता. तेव्हा पतंग उडवताना तो पडला आणि त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!