Sunday, January 26, 2025
Home भोजपूरी ‘बंसी बिरजू’ भोजपुरी चित्रपटाचं गाणं झालं प्रदर्शित, अल्पावधितच ‘इतके’ व्ह्यूज मिळवून केला राडा!

‘बंसी बिरजू’ भोजपुरी चित्रपटाचं गाणं झालं प्रदर्शित, अल्पावधितच ‘इतके’ व्ह्यूज मिळवून केला राडा!

दिनेशलाल यादव निरहुआचा भाऊ आणि अभिनेता प्रवेश लाल यादवचं एक नवीन गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात प्रवेश लालसह सिनेस्टार आदित्य ओझा, चांदनी सिंग आणि सपना गिल देखील आहेत. हे गाणे ‘बंसी बिरजू’ या भोजपुरी चित्रपटातील असून, त्याचे बोल ‘दिल के हमरे खुदा बाडू तू’ आहे. विशेष म्हणजे, या गाण्याला भोजपुरी प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. या गाण्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे, हे गाणे सुपरस्टार रितेश पांडेने त्याच्या मधुर आवाजात गायले आहे. रितेश पांडेची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. त्याची गाणी येताच हिट होतात. हे गाणे ‘वर्ल्डवाइड रेकॉर्ड्स भोजपुरी’ या म्युझिक कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर रिलीझ करण्यात आले आहे. हे गाणं प्रकाशित होताच, याला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

खऱ्या आयुष्यातही प्रवेशलाल यादव आणि आदित्य ओझा यांच्या मैत्रीचे किस्से खूप ऐकायला मिळतात. त्यामुळे ही रील लाइफ जोडी देखील कमाल करेल अशी अपेक्षा आहे. ‘बंसी बिरजू’ या चित्रपटामध्ये हे दोघे पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर धमाल करतील. या चित्रपटात त्यांची मैत्री दाखवण्यात आली आहे. तसेच, दोघांनी मिळून यात बरीच धमाल केली आहे, जे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल. दोघांमध्ये एक अप्रतिम केमिस्ट्री चित्रपटात पाहायला मिळणार आहे, याचा अंदाज ट्रेलर पाहिल्यावरच आला होता. (This song of Bhojpuri film ‘Bansi Birju’ was published, got so many views)

‘बन्सी बिरजू’ या चित्रपटाचा ट्रेलर आधीच वर्ल्डवाइड रेकॉर्ड भोजपुरीवर प्रदर्शित झाला आहे. ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. हा चित्रपट हास्य, संगीत, ॲक्शन, रोमान्स आणि कॉमेडीने परिपूर्ण असल्याचे म्हटले जात आहे.

रत्नाकर कुमार हे वर्ल्डवाइड चॅनल आणि जितेंद्र गुलाटी प्रस्तुत ‘बंसी बिरजू’ चित्रपटाचे निर्माते आहेत. तर दिग्दर्शक अजय कुमार झा आहेत. लेखक संतोष मिश्रा, संगीतकार आशिष वर्मा, गीतकार कुंदन प्रीत आहेत. तर या चित्रपटाचे डीओपी डी के शर्मा आहेत. चित्रपटाचे कार्यकारी निर्माता इमरोज अख्तर (मुन्ना) आहेत. या चित्रपटाच्या मुख्य कलाकारांमध्ये प्रवेश लाल यादव, आदित्य ओझा, काजल राघवानी, चांदनी सिंग, सपना गिल, सुशील सिंग, मनोज वाघ, जे नीलम, अनूप अरोरा, गोपाल राय, रत्नेश बर्नवाल, ब्रजेश त्रिपाठी, अमित शुक्ला, अंशुमन सिंग राजपूत, सुधा झा आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सिडनाझ’च्या नात्याबद्दल सिद्धार्थचा मित्र अबू मलिकने केला मोठा खुलासा, म्हणाला…

-पहाटेच्या ३ वाजता सिद्धार्थ शुक्ला झाला होता अस्वस्थ; आईला मागितले पाणी आणि म्हणाला…
-‘मी माझा मुलगा गमावला आहे’, सिद्धार्थच्या निधनावर प्रत्युषाच्या वडिलांनाही भावना अनावर
author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा