Friday, April 19, 2024

‘उसकी हटेगी तो सबकी फटेगी!’ प्रेक्षकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम, ‘या’ दिवशी रिलीझ होणार टायगर श्रॉफचा ‘गणपत’

बॉलिवूडच्या विश्वात असे बरेच चित्रपट आहेत, जे तयार होऊन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाले आहेत. प्रेक्षकही त्यांच्या आवडत्या कलाकाराला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. अशातच चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन अभिनित ‘गणपत’ या चित्रपटाची रिलीझ डेट समोर आली आहे. बहुप्रतीक्षित पूजा एंटरटेनमेंटचा ‘गणपत’ हा चित्रपट २३ डिसेंबर २०२२ रोजी रिलीझ होणार आहे. प्रॉडक्शन हाऊसने याबाबत माहिती दिली आहे. शिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे.

अलिकडेच टायगर श्रॉफने ‘गणपत’चा टीझर चाहत्यांसोबत शेअर केला होता. या टीझरमध्ये टायगर ऍंग्री लूकमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये, तो हातात बॉक्सिंग हँड रॅप गुंडाळताना दिसतो. इंस्टाग्रामवर टीझर शेअर करताना टायगरने सांगितले होते की, ‘गणपत’ २३ डिसेंबर २०२२ रोजी रिलीझ होणार आहे. पोस्ट शेअर करत त्याने लिहिले, “उसकी हटेगी तो सबकी फटेगी, आरेला है गणपत, तैयार रहना!” महत्त्वाचे म्हणजे, हा चित्रपट २ भागांमध्ये प्रदर्शित केला जाईल. टीझरमध्ये तुम्ही बघू शकता की, टायगरचा लूकही खूप जबरदस्त आहे. (tiger shroff and kriti sanon starrer film ganpat will be released soon know date)

क्रिती सॅनन या चित्रपटात मुख्य भुमिका साकारताना दिसणार आहे. शिवाय यात ती ऍक्शन करतानाही दिसणार आहे. टायगर आणि क्रितीची जोडी याआधी ‘हिरोपंती’मध्ये दिसली होती. या चित्रपटात दोघांनाही पडद्यावर चांगलीच पसंती मिळाली होती. दरम्यान चित्रपटातील तिच्या पात्राचे नाव समोर आले आहे. ती यात जस्सी नावाच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. टायगरचा हा बॅक टू बॅक ऍक्शन चित्रपट आहे. याआधी त्याचा ‘बागी’, ‘​​बागी २’, ‘बागी 3’, ‘हिरोपंती’ आणि मुन्ना मायकल रिलीझ झाला होता, ज्यात त्याची धमाकेदार ऍक्शन पाहायला मिळाली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा महेश भट्ट यांना समजवण्यासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या परवीन बाबी, मग पुढे…

-Netflix TUDUM: माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू, तर ‘अरण्यक’च्या धमाक्यासह ‘या’ प्रोजेक्ट्सची झाली घोषणा

-सिनेमागृह सुरू करण्यास शासनाचा हिरवा कंदील, तरीही ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शनाची तारीख लांबणीवरच

हे देखील वाचा