Tuesday, September 26, 2023

बाप्पाच्या आगमनापूर्वी टायगर श्रॉफने दिले चाहत्यांना सरप्राईज, नवीन ‘गणपत’ चित्रपटाचा पोस्टर रिलीझ

टायगर श्रॉफ सध्या त्याच्या आगामी ‘गणपत’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्यासोबतच त्याच्या चाहत्यांनाही या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. टायगर श्रॉफने चाहत्यांना एक भेट दिली आहे. आज त्याने त्याच्या आगामी ‘गणपत’ चित्रपटाची पहिली झलक शेअर केली आहे. या चित्रपटात हा अभिनेता पुन्हा एकदा दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे.

टायगर श्रॉफ पुन्हा एकदा ‘गणपत’मध्ये क्रिती सेननसोबत पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करण्यासोबतच अभिनेत्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. टायगर श्रॉफने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

पोस्टर शेअर करण्यासोबतच तो लिहितो, “बाप्पाचा हात त्याच्यावर असताना त्याला कोणी काय रोखणार आहे. गणपत नवीन संसार सुरू करायला येतोय. यासोबतच त्यांनी लिहिले की, दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. ‘गणपत’ 20 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, म्हणजेच हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. याआधी हे दोघे 2014 मध्ये आलेल्या ‘हिरोपंती’ चित्रपटात एकत्र दिसले होते. या दोन्ही कलाकारांनी या चित्रपटातून पदार्पण केले आहे. आता टायगर श्रॉफच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर या अभिनेत्याचे बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
आपल्या आवाजाने तरुणांच्या मनावर राज्य करणारे लकी अली तीन लग्न होऊनही राहिले ‘अनलकी’
रितेश-जिनिलीयाचा ‘तो’ रोमॅंटिक व्हिडीओ व्हायरल; चाहते म्हणाले, ‘रितेश दादा आणि वहिनी..’

हे देखील वाचा