‘तारे जमीन पर’मधील अभिनेत्रीने शेअर केला एकदम बोल्ड फोटो, 48व्या वर्षी करतेय चाहत्यांना घायाळ

0
87
Tisca-Chopra
Photo Courtesy: Instagram/tiscaofficial

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरही आपल्या बोल्डनेसचा जलवा दाखवण्यात मागे पडत नाहीत. या अभिनेत्रींमध्ये टिस्का चोप्रा हिच्या नावाचाही समावेश होतो. टिस्काने ‘तारे जमीन पर’ या सिनेमात ईशानच्या आईची भूमिका साकारली होती. ती अभिनयाव्यतिरिक्त तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते. ती सोशल मीडियावर जोरदार सक्रिय असते. यावर ती तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशात तिने पुन्हा एकदा आपल्या बोल्ड फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

टिस्का चोप्रा (Tisca Chopra) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा बिकिनीतील फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती गुलाबी रंगाच्या मोनोकिनीमध्ये स्विमिंग पूलमध्ये बोल्ड अंदाजात पोझ देताना दिसत आहे. फोटोत 48 वर्षांच्या टिस्काची स्लिम आणि टोंड फिगरही दिसत आहे. टिस्काने तिचा फोटो शेअर करत भन्नाट कॅप्शनही दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये “रविवारच्या सकाळची योग्य सुरुवात. आजच्या दिवशी व्यायाम करण्याची तुमची काय योजना आहे,” असे लिहिले आहे. याव्यतिरिक्त तिने अनेक हॅशटॅग्जही लावले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tisca Chopra (@tiscaofficial)

टिस्काचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
टिस्काचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंना 45 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, या फोटोवर 500हून अधिक कमेंट्सही आल्या आहेत. कुणी तिला ‘जलपरी’ म्हणत आहे, तर कुणी ‘हॉट दिसतेय’ असे म्हणत आहेत. एकाने लिहिले की, “मी पाणी असतो तर किती मजा आली असती.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “बिकिनीतील आणखी फोटो पोस्ट कर.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Tisca Chopra (@tiscaofficial)

टिस्का चोप्रा झळकणार ‘या’ सिनेमात
टिस्का हिने अनेक सिनेमात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ती लवकरच ‘दहन’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 16 सप्टेंबर रोजी हा सिनेमा डिझ्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत सौरभ शुक्ला मुख्य भूमिकेत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
लग्नापूर्वी ऐश्वर्यासाठी ‘हा’ अभिनेता होता इंडस्ट्रीतील ‘सेक्सी’ पुरुष; अभिनेत्रीने कुणाचे घेतलेले नाव?
‘विचार करून पोझ देत जावा मॅडम’, बाथटबमधील अक्षराच्या ‘तसल्या’ फोटोंवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट
‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाचे अनेकांनी केले कौतुक, पण विवेक अग्निहोत्री यांच्या ‘त्या’ प्रतिक्रियेने वेधले लक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here