Sunday, May 19, 2024

‘टायटॅनिक’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघात, झाली गंभीर दुखापत

दमदार अभिनेत्रींमध्ये हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री केट विन्सलेटच्या नावाचा समावेश होतो. दरम्यान, केट विन्सलेटबाबत मोठी बातमी समोर येत आहे. केट विन्सलेट क्रोएशियामध्ये तिच्या आगामी ड्रामा पीरियड फिल्म ‘LEE’ च्या सेटवर घसरली आणि पडली. त्यामुळे टायटॅनिक अभिनेत्री केट विन्सलेट जखमी झाली आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान केट विन्सलेट घसरली आहे. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये केट विन्सलेटला गंभीर दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. यासोबतच विन्सलेट एका आठवड्याच्या आत नियोजित वेळेवर ली चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

खरं तर, केट विन्सलेटच्या दुखापतीमुळे ली या ऐतिहासिक ड्रामा पीरियड फिल्मचं शूटिंग मध्यंतरी थांबवण्यात आलं होतं. केट विन्सलेट ही तीच अभिनेत्री आहे जिने 1997 साली हॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय चित्रपट टायटॅनिकमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती. या चित्रपटासाठी केट विन्सलेटला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. मात्र, 46 वर्षीय अभिनेत्री केट विन्सलेटला 2009 मध्ये आलेल्या ‘द रीडर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

केट विन्सलेटच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, आगामी काळात विन्सलेट ली या चित्रपटात दिसणार आहे. केट विन्सलेटचा हा चित्रपट फोटोग्राफर ली मिलरच्या जीवनावर आधारित आहे. हा तोच ली मिलर आहे, ज्यांनी दुसऱ्या महायुद्धात वार्ताहर म्हणून काम केले होते. या चित्रपटाशिवाय केट विन्सलेट प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अवतारच्या दुसऱ्या भागात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कोण होणार सारा अली खानचा नवरा? करण जोहरच्या प्रश्नावर लाजून लाल झाली अभिनेत्री
कोणतेही काम करण्याआधी अध्यात्मिक गुरूंची ‘हे’ कलाकार घेतात परवानगी, ऐश्वर्याने तर प्रेम करतानाही…
चित्रपटांनी समृद्ध असणाऱ्या महेश भट्ट यांच्या करिअरला वादांमुळे लाभली काळी किनार

हे देखील वाचा