संतापजनक! पाॅपस्टार रिहानाने गणपतीचा पेंडेंट घालून शेअर केला टाॅपलेस फोटो, सोशल मीडियावर वातावरण तापलं


मागच्या काही महिन्यांपासून दिल्लीमध्ये कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. आधी फक्त भारतापुरतेच मर्यादित असणाऱ्या या आंदोलनावर हॉलीवूडची पॉप सिंगर रिहानाने ट्विट करत या आंदोलनाला जागतिक स्वरूप प्राप्त करून दिले. रिहानाच्या ट्विटवरून खूप मोठा वादंग उसळला होता. तिच्या या ट्विटला देशातील अनेक नागरिकांनी, सेलिब्रिटींनी विरोध केला तर काहींनी तिला पाठिंबा देखील दिला होता. अनेकांनी ट्विट करत रिहानाला आमच्या देशाच्या अंतर्गत गोष्टींबद्दल बोलण्यास नकार सुद्धा दिला होता. अजून हा वाद शांतही झाला नाही तोपर्यंत रिहानाने नवीन वादाला तोंड फोडले आहे.

रिहानाने हिंदू धर्मावर विश्वास असणाऱ्या त्या करोडो लोकांच्या भावना दुखवत त्यांना राग येईल असे कृत्य केले आहे. रिहानाने तिचा एक टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. या टॉपलेस फोटोमध्ये तिने गणपतीचे पेंडंट असलेला नेकलेस घातला आहे.

रिहानाने लव्हेंडर रंगाची पॅन्ट घातली असून त्यावर डायमंडचे ब्रेसलेट, मोठे कानातले घातले आहे. यामध्ये नेटकऱ्यांनी तिने घातलेले डायमंडचे गणपतीचे पेंडेंट देखील पाहिले असून, ती आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

तिच्या या फोटोला अनेक यूजर्सने सडेतोड रिप्लाय दिले आहेत. आम पासून खासपर्यंत अनेकांनी तिला यागोष्टीबद्दल फटकारले आहेत. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी देखील तिला फाटकवत चेतावणी दिली आहे. त्यांनी सांगितले की, “सनातन धर्म इतका सहिष्णू आणि ताकदवान आहे की, चित्रपट, जाहिराती, तुकडे तुकडे गॅंगवाले याचा चुकीचा फायदा उचलून आपल्या देवी देवतांचा अनेकदा अपमान करून जातात. दुसरीकडे इतर कोणत्याही धर्मविरोधात साधे काही झाले तरी संपूर्ण जगात याविरोधात हंगामा होतो. आमच्या सहनशीलतेची परीक्षा घेऊ नका. अती झाले की माती होतेच.”

यासोबतच अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्विट करून फटकारले आहेत.

“आमच्या धर्माला आमच्या देवाला कोणीही असे चुकीच्या पद्धतीने जगासमोर दाखवू शकत नाही. आमच्या धर्माचा आणि देवांच्या तुझ्या स्वार्थासाठी वापर करणे बंद कर. आमच्या देवांसोबत भावना जोडलेल्या आहेत. त्या भावनांचा अनादर करणे थांबावं ” अशा स्वरूपाची उत्तरे तिला मिळत आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.