Friday, March 29, 2024

गौरी सावंत यांनी मुंबई रेडलाइट एरियामधला सांगितला धक्कादायक किस्सा; म्हणाल्या, ‘आई सेक्सवर्कर…’

मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध कर्यक्रम चला हवा येऊ द्या हे मराठी चित्रपटांसाठी प्रमोशन प्लॅटफॉर्म आणि कॉमेडी शो म्हणून ओळखलं जातं, यामध्ये विनोदाचे महारथी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. नुकतंच यामध्ये तृतीय पंथी समाजामधील वेश्या महिलांसाठी सतत झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता गौरी सावंत यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यामधील खडतर प्रवास सांगितला आहे.

प्रसिद्ध तृतीपंती कार्यकर्ता गौरी सांवत (Gauri Sawant) यांनी आपल्या समाजसाठी खूप योगदान दिलं आहे. त्यांना ‘उंच माझा झोका’ या पुरस्काराने देखिल सन्मानित केलं आहे. सध्या त्या ‘आजीचं घर’ ही संस्था चालवत आहेत. या संस्थेमार्फ वेश्या महिलांच्या मुलींचे संगोपन करतात नुकतंच त्यांनी मराठी वाहिनीवरील प्रसद्ध कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’  मध्ये हजेरी लावली होती. यामध्ये त्यांनी यांनी आजीचं घर या संस्थेबाबत सांगताना  रेड लाइट एरियामधील एक प्रसंग सांगितला आहे, ज्याचा व्हिडिओ झी मराठी वाहिनीने आपल्या अधिकृत आकाउंटवरुन शेअर केला आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गौरी सावंत म्हणाल्या की, “मुंबईच्या रेड लाइट एरियामध्ये मी सहजच पाहानी करायला गेले होते. महिलांच्या आरोग्याची तपासणी नियमित होते की नाही हे पाहाण्यासाठी तिथे गेले तेव्हा तिथे 20 ते 22 वर्षाची मुलगी आणि तिच्यासोबत अजून एक लहान मुलगी बसली होती. मी त्या लहान मुलीकडे बघून हसले तेव्ही ती 20, 22 वर्षाची मुलगी मला म्हणाली, तुली ही पाहिजे का? मग मी तिला विचारलं की, तु हिला माझ्याकडे पाठवणार का? यावर तिने मला उत्तर दिलं की, जर हिला मी तुझ्याकडे पाठवले नाही तर ही पण माझ्याच वळणावर जाणार.”

 

View this post on Instagram

 

ती मुलगी पुढे म्हणाली की, “तुम्ही मिरचीचं झाड पाहिलं असेल. मिरचीच्या झाडाला येणारी फुलं देखिल तिखट असतात. हे उदाहरण सांगायचा इतकाच हेतू की, आई सेक्स वर्कर आहे म्हणून माझी मुलं सेक्स वर्कर होणार नाहीत याची जबाबदारी मी घेतली. म्हणून ते माझं ‘आजीचं घर.” यानंतर त्यांनी त्या मुलीला त्यांच्या संस्थेमध्ये स्थान दिले. गौरी सावंत यांच्या आजीचं घर या संस्थेतमुळे अनेक सेक्सवर्कर महिलांच्या मुलांना जीवनदान मिळालं आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
९५ व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकन यादी जाहीर, पाहा कोण कोण आहे पुरस्कारांच्या शर्यतीत ?
अभिमानस्पद! ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करमध्ये नामांकन मिळाल्यानंतर दिग्दर्शक राजामौली यांनी व्यक्त केल्या भावना

हे देखील वाचा