Friday, March 29, 2024

‘मिस चेन्नई’ बनल्यानंतर ‘या’ सुप्रसिद्ध अल्बममध्ये काम करण्याची मिळवली होती तिने संधी, अक्षय कुमारसोबतही केलंय काम

दक्षिण भारतीय सिनेमाच्या अशा बऱ्याच सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आहेत, ज्यांनी बॉलिवूडमध्येही चांगली कामगिरी केली आहे. यात अभिनेत्री तृषा कृष्णन हिचेही नाव सामील आहे. तृषा दक्षिण भारतीय सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. यासह ती बॉलिवूड अभिनेत्रीही बनली आहे. ४ मे, १९८३ रोजी चेन्नई येथे जन्मलेल्या तृषाने करमणूक जगात बरेच नाव कमावले. चला तर मग तृषाच्या वाढदिवशी, तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया…

तृष्णा कृष्णनने चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी, अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. एवढेच नव्हे तर तिने ‘मिस चेन्नई’चे विजेतेपदही जिंकले आहे. या गोष्टीला तृषा तिच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण वळण मानते. कारण मिस चेन्नईचे विजेतेपद जिंकल्यानंतर, तृष्णा फाल्गुनी पाठक यांच्या ‘मेरी चुनर उड उड जाए’ या अल्बम गाण्यात सहाय्यक अभिनेत्री म्हणून दिसली. या गाण्यात तृष्णा आयशा टाकियाची मैत्रीण बनली होती. हे गाणे प्रेक्षकांकडून खूप पसंत केले गेले.

पुढे तृषाने २००२ साली, ‘मौनम पेसीयाडे’ या चित्रपटाद्वारे नायिका म्हणून प्रवेश केला. तथापि २००३ मध्ये रिलीझ झालेला ‘सामी’ हा चित्रपट तिच्या कारकिर्दीचा पहिला हिट चित्रपट ठरला. यानंतर तिला बर्‍याच चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या.

तमिळ चित्रपटानंतर, तृषाने २००४ मध्ये तेलुगु चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. तिचा ‘वर्षम’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत चांगली कामगिरी केल्यानंतर, तृषा बॉलिवूडकडे वळाली. तिने ‘खट्टा मीठा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात अक्षय कुमार तिचा नायक होता.

चित्रपटांशिवाय, त्याकाळी तृषा तिच्या अफेयरविषयीही बरीच चर्चेत होती. त्रिशाचे नाव राणा डग्गुबतीशी जोडले जायचे. या दोघांच्या डेटिंगच्या बातम्याही समोर येऊ लागल्या होत्या. तथापि, काही कारणास्तव हे नाते फार काळ टिकले नाही. राणा व्यतिरिक्त दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध अभिनेता विजय सोबतच्या अफेयरच्या वृत्तांमुळेही तृष्णा चर्चेत आली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रेमासाठी काहीही! प्रेम मिळवण्यासाठी ‘या’ कलाकारांनी चित्रपटात हद्दच केली पार, सुनील शेट्टीही यादीत सामील

-नवव्या वर्षी पहिला सिनेमा करुन ३००हून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या अरुणा इराणींना प्रेरणादायी सिनेप्रवास

-बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध जोडप्यांना लग्नानंतर झाले नाही मूल, दिलीप कुमार अन् सायरा बानोचाही समावेश

हे देखील वाचा