Monday, November 9, 2026
Home › टेलिव्हिजन › अभिनेता अंकित सिवाचने केला कास्टिंग काऊचचा खुलासा म्हणाला, ‘माझ्याकडे न्यूड फोटो…’

अभिनेता अंकित सिवाचने केला कास्टिंग काऊचचा खुलासा म्हणाला, ‘माझ्याकडे न्यूड फोटो…’

हिंदी सिनेसृष्टीच्या झगमगाटी दुनियेचे जितके चांगल्या कामांसाठी कौतुक केले जाते. तितक्याच या दुनियेतील वाईट किस्सेही नेहमीच चर्चेत असतात. काही वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये मीटूच्या वादळाने मोठी खळबळ माजली होती. यावेळी अनेक आघाडिच्या अभिनेत्रींनी आणि अभिनेत्याने त्यांच्याबद्दल आलेले असेच अनुभव सांगितले होते. आता पून्हा एका आघाडिच्या अभिनेत्याने त्यालाही अशा प्रकारची मागणी झाली होती असा खुलासा केला आहे. तेरी “झुकी झुकी सी नजर’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या अंकित सिवाचने (Ankit Siwach) हा खुलासा केला आहे. 

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, अंकित सिवाच हा हिंदी टिव्ही मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने मालिका क्षेत्रात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. मात्र त्याला इथपर्यंत यायला प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. ज्यामुळे अभिनय आणि मालिकांमध्ये काम मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यालाही कास्टिंग काउचचा सामना करावा लागल्याचा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे. एका मुलाखतीत बोलताना अंकितने या विषयावर आपले मत मांडले आहे.

त्याला आलेल्या या वाईट अनुभवाबद्दल बोलताना तो म्हणतो की, “आपण प्रत्येक व्यक्तीला चांगले समजत असतो त्याच्या वाईट गुणांकडे सहज दुर्लश करतो आणि इथेच आपण फसतो. माझ्याही बाबतीत असेच झाले होते. अशी अनेक उदाहरणे आहेत जेव्हा मला माझे न्यूड फोटो पाठवण्यास सांगितले गेले. मला अशा पार्ट्यांमध्ये आमंत्रित केले गेले होते ज्यांचा कामाशी काहीही संबंध नव्हता. हे जवळजवळ लैंगिक छळ केल्यासारखे होते, कारण मी या सर्व गोष्टींसाठी कधीच तयार नव्हतो.”

याबद्दल पुढे बोलताना अंकित म्हणाला की, “मला अभिनय क्षेत्रात जे यश मिळवायचे आहे, जे करायचे आहे त्यासाठी हा एकमेव मार्ग आहे, असे मला भावनिक बळजबरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मला अशा अनेक प्रस्तावांना सामोरे जावे लागले, तर अनेकांनी मला काम आणि करिअरसाठी तडजोड करावी लागेल, असे थेट संकेत दिले. मला अनेक अभिनेत्यांची उदाहरणे दिली गेली. मला सांगण्यात आले की, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कोणतीही तडजोड न करता हे करू शकता तर ते चुकीचे आहे.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा