Tuesday, June 24, 2025
Home टेलिव्हिजन शीझान खानने तुनिषाच्या आईवर साधला निशाणा? म्हणाला, ‘तुम्ही माझी चमक कमी…’

शीझान खानने तुनिषाच्या आईवर साधला निशाणा? म्हणाला, ‘तुम्ही माझी चमक कमी…’

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्म’हत्ये प्रकरणात शीजान खान नुकताच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आहे. कोर्टाने अभिनेत्याचे व्यावसायिक जीवन लक्षात घेऊन त्याचा पासपोर्ट परत करत त्याला परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. अशात आत बातमी आली होती की, शीझान खान ‘खतरों के खिलाडी‘चा भाग बनणार आहे आणि तो लवकरच त्याच्या शूटिंगसाठी परदेशात रवाना होणार आहे. मात्र, यावर तुनिषा शर्माच्या आईने खतरों के खिलाडी शोच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे. तर तिकडे शीजानने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे, ज्यामुळे ताे चांगलाच चर्चेत आला आहे.

शीझान खान (sheezan khan) याने त्याच्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहिले, ‘तुम्ही माझी चमक कमी करू शकत नाही…’. ही पोस्ट समोर आल्यानंतर अभिनेत्याने नाव न घेता तुनिषाच्या आईवर निशाणा साधला असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sheezan M Khan BABA (@sheezan9)

दुसरीकडे, तुनिषाच्या आईने न्यायालयाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच त्यांनी चॅनलच्या या निर्णयालचा विरोध करत मोठे पाऊल उचलले आहे. अभिनेत्रीच्या आईचे म्हणणे आहे की, ‘एखाद्याविरुद्ध खटला सुरू असेल आणि आरोपपत्र त्या व्यक्तीविरुद्ध असेल, तर ते त्याला शाेमध्ये कसे दाखवणार? ‘अलीबाबा’ हा त्याचा पहिला लीड शो होता आणि या संपूर्ण घटनेपूर्वी त्याला कधीही ऑफर आली नव्हती. अशात आता अचानक त्याला ‘खतरों के खिलाडी’ची ऑफर आली? कशाच्या आधारावर? तुनिषासोबत जे काही घडले त्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. चॅनल काय संदेश देत आहे? ते टीआरपीसाठी गुन्हेगाराला प्रोत्साहन देत आहेत. आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करू.’

तुनिषा शर्माने ‘अली बाबा दास्तान ए काबुल’ या शाेच्या सेटवर आत्म’हत्या केली होती. तिच्या मृत्यूनंतर, तुनिषाच्या आईने अभिनेत्रीचा प्रियकर आणि सहकलाकार शीझान खानवर आत्म’हत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला, ज्या अंतर्गत पोलिसांनी अभिनेत्याला कलम 306 अंतर्गत अटक केली.(Tv actor sheezan khan shared cryptic post on social media netizens asked is it a indirect message to tunisha mother)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्मृती इराणी यांचा 25 वर्ष जुना ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल; माॅडेलिंग करिअर येणार हाेते संपुष्टात

‘खतरों के खिलाडी 13’मध्ये शीझान खानला कास्ट केल्यामुळे संतापली तुनिषा शर्माची आई, चॅनला पाठवली कायदेशीर नोटीस

हे देखील वाचा