Wednesday, December 6, 2023

देवोलीनाने सांगितले थाटामाटात लग्न न करण्याचे कारण; म्हणाली, ‘लोक मला गोल्ड डिगर…’

टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिने नुकतेच जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत लग्न करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. दोघांनी मित्र आणि जवळच्या लोकांमध्ये एका खाजगी समारंभात कोर्ट मॅरेज केले होते. मात्र, तिचे चाहते तिचे अभिनंदन करत असतानाच अभिनेत्रीला ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत शाहनवाजवर त्यांच्या लग्नात पैसे खर्च न केल्याचा आरोप करणाऱ्या ट्रोलला प्रत्युत्तर दिले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान देवोलिना भट्टाचार्जी (devoleena bhattacharjee)हिने या गोष्टींवर तिची प्रतिक्रिया दिली आणि ती म्हणाली की, “शाहनवाजने तिच्यावर पैसे खर्च केले नाहीत.”अभिनेत्री म्हणाली, “शाहनवाज इंडस्ट्रीचा नाही, पण चांगला सेटल आहे. फिटनेस इंडस्ट्रीमध्ये त्याचे स्वतःचे काम आहे. जर मी लग्न भव्य केले असते आणि पैसे दाखवले असते तर. ट्रोल्सने  मला ‘गोल्ड डिगर’ म्हटले असते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

पुढे, देवोलीनाने असेही सांगितले की, “जेव्हा ती निर्णय घेते तेव्हा सोशल मीडियावर ट्रोल करणारे काय प्रतिक्रिया देतील याचा विचार करत नाही.” आपला मुद्दा पुढे करत अभिनेत्री म्हणाली की, “आम्हा दोघांनाही आमच्या आनंदाची आणि भविष्याची काळजी आहे. मला वाटते की, जर आम्ही चांगले असू तर यूनिवर्सचा आशीर्वाद आम्हाला वाढण्यास आणि एकत्र राहण्यास मदत करणार.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

देवोलिना गेल्या दोन वर्षांपासून शाहनवाजला डेट करत होती. चार वर्षांपूर्वी अभिनेत्री शाहनवाजला एका जिममध्ये भेटली आणि त्यांच्याशी मैत्री केल्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. देवोलीनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर  फोटो शेअर करून तिच्या लग्नाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती.(tv actress devoleena bhattacharjee react for not money spending on their wedding with shahnawaz sheikh)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
व्हिडिओ: सिनेमाच्या प्रमोशनला गेला अन् चप्पल खाऊन आला ‘हा’ अभिनेता, घटना कॅमेऱ्यात कैद

शाहरुख अन् दीपिकाचा नवा धमाका, सिद्धार्थ आनंदने उघड केले ‘पठाण’च्या दुसऱ्या गाण्याचे रहस्य

हे देखील वाचा