Sunday, December 8, 2024
Home टेलिव्हिजन आदिलला जेलमध्ये टाकून पाेलिसाची भूमिका साकारणार राखी? अभिनेत्रीच्या भावाचा माेठा खुलासा

आदिलला जेलमध्ये टाकून पाेलिसाची भूमिका साकारणार राखी? अभिनेत्रीच्या भावाचा माेठा खुलासा

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिचा पती आदिल खान दुर्रानीसोबत सुरू असलेल्या वादामुळे चर्चेत आहे. आधी राखीच्या आईचे निधन आणि नंतर तिच्या वैवाहिक जीवनातील कोलाहल यामुळे गेले काही महिने अभिनेत्रीसाठी प्रचंड कठीण गेले आहेत. आता या सगळ्यामध्ये राखीशी संबंधित एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राखी लवकरच तिच्या जीवनावर आधारित चित्रपटात दिसणार आहे.

सर्व अडचणीनंतर राखी सावंत (rakhi sawant) आता तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. तिने अलीकडेच दुबईत एक अभिनय अकादमी उघडली असून आता ती एक चित्रपट बनवणार आहे. या चित्रपटाच्या नावासाेबतच पाेस्टरही समाेर आले आहे. राखीचा भाऊ राकेश त्याच्या बहिणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे, ज्याचे नाव ‘राउडी राखी’ असेल. राखी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून ती मुख्य भूमिकेतही आहे. या चित्रपटाचा निर्माता गौरव असेल.

 rakhi sawant
rakhi sawant

राखीचा भाऊ दिग्दर्शक राकेशने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, “तो राखीच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार आहे. या चित्रपटात राखी एका राऊडी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.” राखी खऱ्या आयुष्यातही राऊडी आहे. तिने पती आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे पालिसांनी त्याला 7 फेब्रुवारीला अटक केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Delhi Times (@delhi.times)

राखी सावंत बॉलिवूड अभिनेत्री आहे. ती बिग बॉस शोमध्येही दिसली हाेती. तिने बर्‍याच चित्रपटांमध्ये छाेट्या-माेठ्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते. राखी सावंत तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी माेठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. तिला ‘ड्रामाक्विन’ म्हणूनही ओळखले जाते.( tv actress rakhi sawant film rowdy rakhi based on her life she will play police role brother director rakesh announced )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अर्रर्र! शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात घुसले दाेन भुरटे, सुरक्षा असूनही घटना घडल्याने खळबळ
जया बच्चन पॅपराझींसाेबत दिसल्या मस्ती करताना; पाेज देत म्हणाल्या, ‘बघा मी किती…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा