Saturday, July 27, 2024

चुलीवरच्या पदार्थाची चव जमिनीवर बसून चाखली अन्….; रुबिनाच्या साधेपणाचं सर्वत्र कौतुक, एकदा पाहाच व्हिडिओ

बिग बॉस 14‘ ची विजेती रुबिना दिलैक सध्या तिच्या गावी पोहोचली आहे. रुबिना हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलाची रहिवासी आहे. ती जेव्हाही तिच्या घरी जाते, तेव्हा ती तिथल्या संस्कृतीत रमून जाते. अशात अलीकडेच तिची बहीण ज्योतिका दिलीकने व्हिडिओ क्रियटर रजत शर्मासोबत लग्न केले. लग्नात सहभागी होण्यासाठी रुबिना पती अभिनव शुक्लासोबत पोहोचली होती. अशात नुकतेच रुबिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गावात घालवलेल्या सुंदर क्षणांची झलक दाखवत आहे.

रुबिना दिलीक (rubina dilaik) हिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती चुलीसमाेर हिमाचल प्रदेशच्या पारंपारिक पोशाखात बसली असून काहीतरी खाताना दिसत आहे. ती चुलीवर काहीतरी शिजवत आहे आणि चुलीखालची आग वाढवण्यासाठी फुंकणीने चुलीत फुंकर मारतानाही दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ नेटिझन्सना खूप आवडला आहे. अभिनेत्रीने 11 तासांपूर्वी हा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओवर जवळपास 1.5 लाख लाईक्स आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

रुबिना हिमाचल प्रदेशच्या पारंपारिक पोशाखात भारतीय स्त्रीप्रमाणे सिंदूर-टिकली लावून दिसत आहे. यावेळी अभिनेत्री चुलीवर शिजवलेल्या रताळ्याचा आस्वाद घेत आहे. तिची देसी स्टाइल पाहून तिचे चाहते खूप आनंदी आहेत. व्हिडिओवर कमेंट करून ते आपली उत्सुकता व्यक्त करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

एका चाहत्याने विचारले, ‘तुम्ही काय खात आहात?’, तर एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘पारंपारिक पोशाखात सुंदर दिसत आहे, ज्याची एक वेगळीच शोभा आहे.’ रुबिना यापूर्वी अनेकदा ग्रामीण जीवनाचा आनंद घेताना दिसली आहे. ( tv actress rubina dilaik enjoying village life hometown himachal pradesh wearing traditional dress eating tasty food watch viral video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! ‘या’ मराठी अभिनेत्रीने वयाच्या पन्नाशीमध्ये बांधली पुन्हा लगीनगाठ, व्हिडिओ झाला व्हायरल

माधुरीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस; म्हणाली, “निस्वार्थी निखळ मुलांमध्ये…”

हे देखील वाचा