Friday, December 1, 2023

संजीदाने मुलीसोबत शेअर केला बोल्ड फोटो; युजर्स ट्राेल करत म्हणाले, ‘लाज वाटली पाहिजे…’

कयामत‘, ‘क्या होगा निम्मो का‘ आणि ‘इश्क का रंग सफेद‘ यासारख्या हिट टीव्ही मालिकांमध्ये दिसलेली संजीदा शेख आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. संजीदाची गणना टीव्हीच्या बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते. संजीदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील कायमच सक्रिय राहते. संजीदाचे सोशल मीडिया अकाउंट तिच्या बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. दरम्यान, तिचा एक फाेटाे चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या मुलीसोबत बिकिनीमध्ये दिसत आहे, ज्यामुळे तिला खूप ट्रोल केले जात आहे.

संजीदा शेख (sanjeeda sheikh) हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे, जो खूप बोल्ड आहे. या फोटोमध्ये संजीदा तिच्या मुलीसोबत उभी असलेली दिसत आहे. फाेटाेत तुम्ही पाहू शकता की, संजीदाने पिवळ्या रंगाची प्रिंटेड बिकिनी घातली आहे, तर तिच्या मुलीने निळ्या रंगाचा स्विमसूट कॅरी केला आहे. अशात आई आणि मुलगी दोघेही पाण्यात खूप मस्ती करताना दिसत असून त्यांचे हा फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjeeda Shaikh (@iamsanjeeda)

अशात अनेक युजर्स संजीदा शेखच्या फोटोला लाईक करत आहेत, तर अनेक जण तिला ट्रोल करताना दिसत आहेत. खरं तर, लोकांना अशा प्रकारे मुलीसोबत बिकिनी फोटो पोस्ट करणे आवडत नाही. याच कारणामुळे तिला खूप ट्रोल केले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjeeda Shaikh (@iamsanjeeda)

फोटोवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘तुमच्या मुलीसोबत असे फोटो पोस्ट करणे तुम्हाला शोभत नाही. त्याचवेळी दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की, ‘त्याचा मुलीवर खूप वाईट परिणाम होतो.’ अशात एकाने कमेंट करत लिहिले की, ‘तुम्ही मुलीसोबत बिकिनी फोटो शेअर केल्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अशा अनेक कमेंट्स अभिनेत्रीच्या या फोटोवर येत आहेत.

संजीदा शेख हिच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर ती लवकरच ‘हिरामंडी’ या सीरिजमध्ये दिसणार आहे, जी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित हाेईल. (tv actress sanjeeda sheikh brutally trolled for bikini photo with daughter goes viral )

अधिक वाचा-
झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’चा टिझर रिलीज, स्टारकिड्सच्या धमाल शैलीने जिंकली चाहत्यांची मने
आलिया भट्टचा हॉट अंदाज चाहत्यांना लावतोय वेड, तुम्ही पाहिला का?

हे देखील वाचा