Tuesday, June 25, 2024

हाय गर्मी! अभिनेत्री संजीदा ब्रालेट घालून केला ‘ना तडपा’ गाण्यावर लक्षवेधी डान्स, तुम्ही पाहिला का?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री संजीदा शेख हिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा असते. सोबतच दुसरीकडे ती तिच्या सौंदर्यामुळे आणि बोल्डनेसमुळे सर्वत्र चर्चेत असते. ती प्रत्येक दिवशी तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्यामुळे तिचे चाहते तिच्या फोटोची आतुरतेने वाट बघत असतात. नुकतेच संजीदाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

संजीदाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. तिने ब्रालेटमधील हा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. यावर तिने लाल रंगाचे एक जॅकेट देखील घातले आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘ना तडपा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यासोबतच तिच्या मागे अनेक डान्सर डान्स करताना दिसत आहेत. तिच्या या व्हिडिओला दीड लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज आले आहेत. (Actress sanjeeda Sheikh’s dance video viral on social media)

तिचा हा व्हिडिओ अनेकांना खूप आवडला आहे. या व्हिडिओवर कोरीओग्राफर एश्ले रिबेलोने कमेंट केली आहे की, “वाह मला पण डान्स शिकव.” तिच्या एका चाहत्याने लिले आहिहे की, “खूप सुंदर.” तसेच तिच्या अनेक चाहत्यांना तिची फॅशन आवडली आहे. तिचे सगळेच डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. तिच्या या डान्सचे देखील खूप कौतुक होत आहे.

संजीदाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००५ मध्ये ‘क्या होगा निम्मो का’ या मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात केली. तिच्या या पहिल्याच मालिकेने तिला खूप ओळख मिळाली. यानंतर तिने ‘एक हसीना थी’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘इश्क का रंग सफेद’, ‘कुंडली भाग्य’, ‘नागीन ३’ आणि ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेत काम केले.

संजीदाने ‘नच बलिये ३’ या शोमध्ये आमिर अली याच्यासोबत भाग घेतला होता. त्या दोघांनीही या शोची ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर २०१२ मध्ये तिने आमिर अलीसोबत लग्न केले. २०१९ मध्ये त्यांना सरोगसीद्वारे आयरा ही मुलगी झाली आहे, परंतु ते दोघेही एकमेकांपासून लांब राहतात. मात्र, आजही त्यांचे नाते चांगले आहे. सोशल मीडियावर ते एकमेकांच्या फोटोवर कमेंट करत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा