Tuesday, March 5, 2024

मिसकॅरेजनंतर स्मृती इराणी दुसऱ्याच दिवशी परतली कामावर; एकताला मेडिकल रिपोर्ट्स दाखवत म्हणाली, ‘भ्रूण राहिलं…’

स्मृती इराणी हे एक असे नाव आहे जे छोट्या पडद्यापासून ते देशाच्या राजकीय कॉरिडॉरपर्यंत लोकप्रिय आहे. अशात ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी‘ या मालिकेतील तुलसीने म्हणजे स्मृती इराणी यांनी इतक्या वर्षांनतर एक माेठा खुलासा केला आहे. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…

माध्यमाशी संवाद साधताना स्मृती इराणी (smriti irani) यांनी नोकरदार महिलांच्या वेदना सांगितल्या. त्या म्हणाल्या की, “मी जेव्हा ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेत काम करत होते, तेव्हा मी प्रेग्नंट राहिली, पण मला याची माहिती नव्हती. मी मालिकेसाठी सतत शूटिंग करत होते आणि मला खूप थकवा जाणवत होता. मी सेटवरही सांगितले की, मला बरे वाटत नाही. तरीही मला सतत काम करायला लावलं. शूट संपेपर्यंत संध्याकाळ झाली होती. त्यानंतर मी माझ्या डॉक्टरांशी बाेली अन् त्यांनी मला सोनोग्राफीसाठी बोलावले. मला अजूनही आठवते की, मी हॉस्पिटलला ऑटोमध्ये जाताना मुसळधार पावसात भिजत गेली. वाटेत मला रक्तस्त्राव सुरू झाला. अशात मी एका हॉस्पिटलमध्ये पोहोचले, मला खूप रक्तस्त्राव होत असतानाही एक नर्स माझ्याकडे ऑटोग्राफ मागण्यासाठी धावत आली. मी तिला ऑटोग्राफ दिला आणि विचारले की, तुम्ही मला एडमिट करला, मला असे वाटते की, माझे मिसकॅरेज झाले आहे.”

यानंतर स्मृती यांनी ऐकताबद्दल असे काही सांगितले जे एकून सर्वच थक्क झाले. अभिनेत्री म्हणाल्या की, “जेव्हा तिने एकता कपूरला हा प्रकार घडल्याचे सांगण्यासाठी फोन केला, तेव्हा तिने लगेचच उद्या शूटला येण्यास सांगितले. जे की, शोमध्ये इतर 50 पात्रेही हाेती त्यामुळे ट्रॅक कुणासोबतही शूट केला जाऊ शकत हाेता. पण शोमधील एका अभिनेत्याने एकताला सांगितले होते की, स्मृती खोटे बोलत आहे.”

या प्रकरणी स्मृती इराणीने रवी चोप्राचे कौतुक करत सांगितले की, “त्यावेळी मी रवी चोप्राच्या सीरियल रामायणमध्येही काम करत होती, जेव्हा मी रवीजींना सांगितले की, माझ्यासोबत असे घडले आहे, पण मी उद्या परत येईन, तेव्हा त्यांनी साफ नकार दिला आणि वेड्यासारखे बोलू नका, तुम्ही तुमचे मूल गमावले आहे. मला माहित आहे ते किती वेदनादायक आहे, तुम्ही आराम करा. उद्या येण्याची गरज नाही, आम्ही मॅनेज करू असे सांगितले.”

स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, “मी गर्भपातानंतर दुसऱ्या दिवशी कामावर परतले. कारण, मला माझ्या घराचा ईएमआय भरायचा होता. माझ्याकडे पर्याय नव्हता. मी थेट एकता कपूरकडे गेले आणि तिला माझे सर्व मेडिकल पेपर दाखवले. मी एकताला सांगितले की, हे नाटक नाही. ती अस्वस्थ झाली आणि तिने मला कागदपत्रे दाखवू नकोस असे सांगितले. मी तिला म्हणाली, “भ्रूण राहिले नाही, नाहीतर तेही दाखवले असते.” (tv actress smriti irani miscarriage pregnancy ekta kapoor during kyunki saas bhi kabhi bahu thi shoot and praise ravi chopra )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धर्म बदलल्यानंतर राखी सावंतने पहिल्यांदाच रोजा ठेवला; बुरखा परिधान केलेला व्हिडीओ व्हायरल

बाॅलिवूडमध्ये शिल्पा शेट्टीपासून ते आमिर खानपर्यंत ‘या’ स्टार्सनी थेट चाहत्यांसाेबत थाटला संसार

हे देखील वाचा