Tuesday, May 21, 2024

‘हे’ चार स्पर्धक एलिमिनेशनसाठी झाले नॉमिनेट, जाणून घ्या कारण

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त शाे ‘बिग बॉस 16‘च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये बरेच ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण टास्क जिंकण्यासाठी आणि एलिमिनेशनमध्ये नॉमिनेशन होण्यापासून वाचवण्यासाठी एकमेकांच्या विरोधात गेले आहे. एपिसोडची सुरुवात प्रियांका चाैधरी आणि अर्चना गौतम यांच्यात चपातीवरून झालेल्या भांडणाने झाली. यानंतर अर्चना आणि प्रियांका चौधरी यांच्यात जाेरदार भांडण झाले.

प्रियांका (Priyanka Choudhary) अर्चना (Archana Gautam) हिला म्हणाली, “आई-वडिलांनी काही शिकवले नाही का?” मग अंकित गुप्ता मधे येतो आणि अर्चना गौतमला नीट बोलायला सांगतो. या भांडणानंतर नॉमिनेशनचे टास्क होते. सौंदर्या शर्मा हिने टीना दत्ताला नॉमिनेट केले तर, शालीन भानोत यांनी गौतम विज याला नाॅमिनेट केले. प्रियांका चौधरीनेही शालीनला नॉमिनेट केले आणि टीनानेही सौंदर्याला नॉमिनेट केले.

शेवटी, टीना दत्ता, गौतम विज, शालीन भानोत आणि सौंदर्या शर्मा हे एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले. नॉमिनेशन टास्कनंतर शालीनचा वाढदिवस असल्याने घरात उत्सवाचे वातावरण आहे. बिग बॉसने शालीनला कन्फेशन रूममध्ये बोलावले आणि त्याला सरप्राईज म्हणून वाढदिवसाला चिकन गिफ्ट केले. यावर शालीन खूप आनंदी हाेताे आणि बिग बॉसचे आभार मानताे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

शालीन भानोटच्या वाढदिवसानिमित्त, टीना दत्ता तिचा पलंग गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवते आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा लिहिते. इतकेच नाही तर, टीना शालीनसाठी रव्याची खीरही बनवते. यानंतर टीना आणि शालीन रोमँटिक क्षण घालवताना दिसत आहेत. शालीन टीनाला सांगते की, “एमसी स्टेनसोबत टीनाचा बॉण्ड त्याला आवडत नाही.” शालीनच्या बोलण्यावर टीनाला राग येतो.

टीना दत्ता शालीन भानोतला सांगते, “जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर, त्यांच्या चारित्र्यावर शंका घेऊ नका. माझ्या आवडत्या व्यक्तीवर कोणी प्रश्न उपस्थित केलेला मला आवडत नाही. माझ्या चारित्र्याला कोणी कलंकित केलेले मला आवडत नाही. आमच्यात काहीही चूकचे नाही. माझे आणि स्टॅनचे चांगले नाते आहे आणि त्याची एक प्रेयसी पण आहे.”

या आठवड्यात साजिद खान बिग बाॅस घराचा कॅप्टन बनला आहे आणि कॅप्टन बनण्यासोबतच त्याला घराचा नवा राजा देखील घोषित करण्यात आलं आहे. (tv bigg boss 16 latest update bb house celebrate shalin bhanot birthday 4 contestent nominate this week)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जाळ अन् धूर संगटच! ऐश्वर्याला लेकीला किस करणे पडले महागात, युजर्सने केले ट्राेल

‘या’ व्यक्तीच्या भीतीने एका रात्रीत मीनाक्षी शेषाद्रीने सोडला देश, अजूनही परतली नाही मायदेशी

हे देखील वाचा