Thursday, December 26, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘हरियाणाची शकीरा’ गाैरी नागोरी बिग बाॅस शोमधून बाहेर, जाणून घ्या कसा होता प्रवास

छाेट्या पडद्याावरील वादग्रस्त शाे ‘बिग बॉस 16‘ मध्ये पुन्हा एकदा घरातील एका सदस्याला या घराचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. या आठवड्याचा ‘सॅटर्डे का वार’ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. निर्मात्यांनी प्रदर्शित केलेल्या व्हिडिओमध्ये, हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की, शोचा होस्ट सलमान खान, स्पर्धक प्रियंका चहर चौधरी हिचे नाव घेत ती घराबाहेर जात असल्याचे सांगत आहे.

रिलीज झालेल्या या प्रोमोमध्ये सर्वजण प्रियांका (Priyanka Choudhary) हिला भेटत आहेत. पण माध्यमातील वृत्तानुसार, गाैरी नागोरी (Gori Nagori) हिला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. तसे, अर्चना गौतमनंतर या आठवड्यात घराबाहेर पडणारी गाैरी ही पहिलीच सदस्य आहे. गाैरी नागोरीच्या चाहत्यांना खूप दुःख झाले की, ती या शोमध्ये दिसणार नाही. त्यांच्यासाठी ही धक्कादायक बातमी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

सुरुवातीला गाैरीने जेव्हा बिग बॉसच्या घरात प्रवेश केला तेव्हा ती खूप शांत दिसत होती. ती कोणाशीच बाेलत नव्हती. मात्र, हळूहळू ती साजिद खान आणि अब्दू रोजिकच्या ग्रुपमध्ये दिसू लागली. यानंतर तिचा खेळ सुरू झाला. या आठवड्यात गाैरी, सुंबुल तौकीर आणि प्रियांका चौधरी या तिघांनाही एकत्र नॉमिनेट करण्यात आले.

माध्यमातील वृत्तांमध्ये, गाैरीला घराबाहेर काढल्याच्या बातम्या सर्रास येत आहेत. त्याचप्रमाणे, सध्या बिग बॉसच्या घरात अर्चना गौतमच्या शोमध्ये पुनरागमन करण्याच्या अनेक बातम्या येत आहेत. अर्चना बिग बॉसच्या घराची एन्टरटेन्मेंट क्वीन राहिली आहे, तिचा खेळ सगळ्यांना खूप आवडला. अशा परिस्थितीत अर्चनाला पुन्हा शोमध्ये पाहण्याचे आवाहन चाहते करत आहेत. (tv bigg boss 16 not priyanka chahar choudhary gori nagori has been evicted from actor salman khan show)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तापसी पन्नू शाहरुखसोबत जाणार सौदी अरेबियाला? जाणून घ्या किंग खानचा प्लान
करीना कपूर खास मित्रांसोबत लुटतेय ख्रिसमसचा आनंद, पाहा फाेटाे

हे देखील वाचा