छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लाेकप्रिय शाे ‘बिग बॉस 16‘ मध्ये सलमान खान शुक्रवारच्या वॉरमध्ये दिसला नाही, पण संपूर्ण शाेमध्ये भांडणं पाहायला मिळाली. शनिवारी (दि. 19 नाेव्हेंबर)ला सलमान खान घरातील सदस्यांवर चांगलाच संतापताना दिसणार आहे. एमसी स्टेन आणि शालीन भानोट यांच्यात जाेरदार भांडण पाहायाला मिळाले. बिग बॉसने दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. या घरात दोघांपैकी एकच राहणार यावर शालीन ठाम आहे. त्याच्या याच वागण्याने आता सलमान खान संतापला आहे.
कलर्सने शोचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये सलमान (salman khan) शालीन (shalin bhanot ) याला सांगत आहे की, “आता घरात फक्त त्याच्या आणि एमसी स्टॅनपैकी एकच काेणी राहिल.” यावर शालीन सलमान म्हणाताे की, “जर ते परवानगी देत असेल तर, मी त्याला सडेताेड उत्तर देताे.” यावर सलमान चिडला आणि म्हणाला, “मग काय करणार?, जिवाने मारणार?”
या प्रोमोमध्ये शालीन सलमानला सांगताे की, “मी खूप जबाबदार व्यक्ती आहे, मी खोड्या करत नाही. तुम्ही परवानगी दिलीत तर मी त्याला धडा शिकवेन.” सलमान खान म्हणाला की, “भांडण तुम्हा दोघांमध्ये आहे, तुम्ही माझ्या परवानगीची वाट का पाहत आहात.” दुसरीकडे, सलमान खानसमोर एमसी स्टेनने आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले. सलमान खानने त्याला विचारले की, “जर तुला चूक कळली तर तू, जाऊन सॉरी का नाही बोलला?”
View this post on Instagram
शालीन एवढ्यावरच थांबली नाही, तर तो स्पष्टपणे सांगतो की, “मी किंवा तो या शोमध्ये राहू.” प्रत्युत्तरात सलमान म्हणाला की, “तुम्हाला कोणीही रोखले नाही.” प्रोमोच्या शेवटी शालीन उठून निघताना दिसला. बिग बॉससोबतच्या संभाषणात शालीनने स्पष्ट केले होते की, “ताे घर सोडणार आहे आणि त्या बदल्यात नुकसान भरपाई देण्यासही तयार आहे.”
सोशल मीडियावर या भांडणाचा लोकांना प्रचंड राग आहे. काहीजण यामागे मास्टरमाईंड टीना दत्ता असल्याचे सांगत आहेत. (tv bigg boss 16 shalin bhanot out of the show after threatening salman khan had breakup with actress tina dutta too)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘रामायण’ मधील रामाशी हाेताे तबस्सुम यांचे खास नाते, जाणून घ्या अभिनेत्रीशी संबंधित न ऐकलेले किस्से
दिशाचे मिस्ट्रीमॅनसोबतचे तसले फोटो व्हायरल; चाहते म्हणाले, ‘टायगर अभी जिंदा है’