‘नेहमी हसत राहा’, म्हणत ट्विंकल खन्नाने मुलगी निताराला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो खास प्रसंगी पत्नी आणि मुलांसोबत फोटो शेअर करत करताना दिसतो. शनिवारी २५ सप्टेंबरला अक्षय कुमारची मुलगी निताराचा वाढदिवस होता. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी मुलगी निताराच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अक्षय आणि ट्विंकलची मुलगी नितारा ९ वर्षांची झाली आहे. निताराच्या वाढदिवसानिमित्त अक्षयने तिला मिठीत घेतलेला एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अक्षय खुर्चीवर बसला आहे आणि नितारा त्याला मिठी मारत असताना त्याच्या मांडीवर बसली आहे. अक्षयने पोस्ट शेअर करत लिहिले की, “मुलीच्या घट्ट मिठीपेक्षा जगात मोठा आनंद नाही. नितारा वाढदिवसाच्या शुभेच्छा. मोठी हो, जगाला सांभाळ, पण नेहमी वडिलांची छोटी मुलगी रहा. लव्ह यू.”

निताराच्या वाढदिवसानिमित्त ट्विंकल खन्नानेही खास पोस्ट शेअर केली आहे. तिने निताराच्या कपाळावर किस करतानाचा एक फोटो शेअर केला असून, या फोटोमध्ये नितारा बर्थडे कॅप घालून बसली आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करताना ट्विंकलने लिहिले की, “माझ्या आयुष्यात ९ वर्षांची गंभीर चेहरा आणि उत्तम सेंस ऑफ ह्यूमर असणारी मुलगी आहे. ती नेहमी हसत असते. वाढदिवसाच्या शुभेच्छा.” ट्विंकल खन्नाच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी निताराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ताहिरा कश्यपने कमेंट करत लिहिले, “खूप प्रेम आणि शुभेच्छा.” तर बॉबी देओलने लिहिले की, “हॅप्पी हॅप्पी बेटा.” रितेश देशमुखने देखील निताराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने अतिशय छोट्या निताराला हातात पकडलेला फोटो पोस्ट करताना लिहिले की, “प्रिय नितारा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, तू एक आहेस, तू प्रत्येक  दिवसाबरोबर अधिक मोहात होत आहेस, लव्ह यू.”

निताराचा वाढदिवस असल्याने अक्षय कुमारसाठी आजचा दिवस खास आहे. अक्षयने त्याचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. २२ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात चित्रपटगृहे सुरू होणार आहेत. त्यामुळे आता रखडलेले सर्व सिनेमे प्रदर्शित होणार आहे. ‘सूर्यवंशी’च्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली आहे. अक्षय कुमारने पोस्ट शेअर करून त्याचा ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज

 


Leave A Reply

Your email address will not be published.